esakal | कोरोनाच्या काळात दंडात्मक कारवाईने बारामतीकर नाराज
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या काळात दंडात्मक कारवाईने बारामतीकर नाराज

पाचशे रुपयांचा दंड भरणे जिकीरीचे ठरणार असल्याचे वाहनचालकांनी नमूद केले.

कोरोनाच्या काळात दंडात्मक कारवाईने बारामतीकर नाराज

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : कोरोनाने आर्थिक संकटात असलेल्या बारामतीकरांवर पोलिसांच्या कारवाईने आज पुन्हा एकदा त्रस्त होण्याची पाळी आली. वाहन चालविण्याचा परवाना नसलेल्या अनेक बारामतीकरांवर काल संध्याकाळी आणि आज पोलिसांनी कारवाई केल्याने लोक संतप्त झाले होते. अनेकांना पाचशे रुपयांपर्यंत दंडाची रक्कम भरण्यास सामोरे जावे लागले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

मंगळवारी संध्याकाळी व आज सकाळीही पोलिसांनी फौजफाटा जमवत दिसेल त्या वाहनचालकाला अडवून त्याच्याकडे वाहन चालविण्याचा परवाना मागितला. परवाना नाही म्हटलं की तातडीने त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली. पोलिसांच्या कामाला किंवा कारवाईला कोणाचाच आक्षेप नव्हता, मात्र पोलिसांनी कारवाईची जी वेळ निवडली, ती योग्य नसल्याची लोकांची भावना आहे. अनेकांना वाहन चालविण्याचा परवाना दाखविण्यासही वेळ दिला नसल्याचा आरोप काही वाहनचालकांनी केला. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ज्या कार्यकर्त्यांनी लॉकडाऊनच्या काळात पोलिसांना जेवण नेऊन देण्यासाठी मदत केली. त्यांच्यावरही पोलिसांनी कारवाई केली. वाहन चालविण्याचा परवाना बहुसंख्य जणांकडे होताच पण कोरोनाच्या काळात मुळातच लोकांचे बाहेर पडणे कमी झाले होते, त्यामुळे अनेकांकडे तो नव्हता, त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

अनेकांची कमाईच बंद आहे, अशा काळात दंडात्मक कारवाई टाळायला हवी होती, असे अनेकांनी सांगितले. या काळात पाचशे रुपयांचा दंड भरणे जिकीरीचे ठरणार असल्याचे वाहनचालकांनी नमूद केले. पोलिसांनी कारवाई जरुर करावी मात्र ही वेळ योग्य नसल्याचे बारामतीकरांनी मत व्यक्त केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

शहरात अनेक ठिकाणी वाहतुकीचे अनेक प्रश्न आहेत, ते मार्गी लावण्यासाठी शक्ती खर्च करा, वाहनचालकांवर कारवाई करण्यापेक्षा याला प्राधान्य द्यायला हवे, अशी भावना काही नागरिकांनी नाव न प्रसिध्द करण्याच्या अटीवर व्यक्त केली.