esakal | बारामतीकरांचे धाबे दणाणले; आणखी 25 रुग्णांचे रिपोर्ट येणे बाकी...
sakal

बोलून बातमी शोधा

Baramati_Corona

अजूनही 25 रुग्णांचे अहवाल येणे बाकी असल्याने आता त्यांचा अहवाल काय येतोय, याकडेच प्रशासनाचे लक्ष आहे.

बारामतीकरांचे धाबे दणाणले; आणखी 25 रुग्णांचे रिपोर्ट येणे बाकी...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

बारामती : कोरोनाग्रस्तांचा आकडा झपाट्याने वाढू लागल्याने आता बारामतीकरांचे धाबे दणाणले आहे. काल झालेल्या 17 तपासण्यांपैकी 9 रुग्ण पॉझिटीव्ह आल्याने आता पुन्हा सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

दरम्यान अजूनही 25 रुग्णांचे अहवाल येणे बाकी असल्याने आता त्यांचा अहवाल काय येतोय, याकडेच आता प्रशासनाचे लक्ष आहे. एकाच दिवसात एकदमच कोरोना रुग्णाचा उद्रेक झाल्याने आता कठोर उपाययोजना राबविण्याशिवाय पर्याय नसल्याचे लोकांचे म्हणणे आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बारामतीत कालपर्यंत रुग्णांचा आकडा 40 पर्यंत पोहोचला होता, आज तो 49 पर्यंत गेला आहे, पुढील 25 रुग्णांचे अहवाल काय येतात यावरच आता पुढील चित्र अवलंबून असेल. अनेक ठिकाणी लोक मास्कविना फिरत आहेत, सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही, गर्दी होत असून कसलीही काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. आता किमान दहा दिवसांचा तरी कडकडीत लॉकडाऊन घेतला पाहिजे, अशी नागरिकांचीच मागणी होत आहे. 

100 खाटांची क्षमता...

रुई येथील कोव्हिड केअर सेंटरमध्ये पॉझिटीव्ह रुग्णांसाठी 20 तर संशयित रुग्णांसाठी 10 खाटांची क्षमता आहे, या पैकी सहा बेड हे अतिदक्षता विभागाचे असून विशेष म्हणजे सर्वच्या सर्व रुग्णांसाठी येथे ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध आहे. सिल्व्हर ज्युबिली रुग्णालय हे महिला रुग्णालयात हलविण्याचे निर्देश देण्यात आले असून ते काम सुरु आहे.

बारामतीत कोरोनाचे थैमान; एकाच दिवसात तब्बल...

आजपासून ज्या रुग्णांना कोरोनासदृश लक्षणे दिसत आहेत, अशा 40 रुग्णांना सिल्व्हर ज्युबिली रुगणालयात दाखल करुन घेण्यास सुरवात करणार असल्याचे डॉ.सदानंद काळे यांनी सांगितले. चार रुग्णांच्या ऑक्सिजनची सुविधा येथे असून लवकरच सर्व रुग्णांसाठी ऑक्सिजनचीही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

वैद्यकीय महाविद्यालयात 35 खाटांची क्षमता आहे. मात्र, रुग्णवाढीचा वेग वाढल्यास प्रशासनाने आतापासूनच खाजगी दवाखाने ताब्यात घेण्याची प्रक्रीया सुरु करायला हवी अशीही मागणी होऊ लागली आहे. 

(Edited By : Krupadan Awale)