
पुणे : एक महिना झाला, पाच वर्षाच्या मुलीचा चेहराही आई पाहू शकली नव्हती. भेटीसाठी व्याकूळ झालेल्या आईने शेवटी ईमेलद्वारे न्यायालयाचे दार ठोठावले. न्यायालयाने याची दखल घेतली आणि आठवड्यातून तीन वेळा व्हिडिओ काॅलद्वारे आई आणि मुलीला बोलू द्यावे, असे आदेश तिच्या पतीला दिले.
लाॅकडाऊन काळात पती-पत्नी भावनिक दृष्ट्या विचार न करता कायद्याचा धाक दाखवून मुलांशी मोबाईल वरून बोलू देत नाहीत, त्यात मुलांची फरफट होत असल्याचा मुद्दा 'सकाळ'ने ट मांडला होता. अशाच प्रकरणात अखेर न्यायालयाने आईला दिलासा दिला आहे.
आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या राधा आणि राजीव यांना पाच वर्षाची प्रिया (तिघांचीही नावे बदललेली आहेत) नावाची मुलीला आहे. या दोघांनी जुलै २०१९ मध्ये घटस्फोटासाठी कौटूंबीक न्यायालयात दावा दाखल केला आहे. सध्या प्रियाचा ताबा राजीव कडे आहे. राधाला दर शनिवारी दिवसभर प्रियाला भेटण्याची परवानगी दिली होती.
मार्च महिन्यात राजीव प्रियाला घेऊन ठाण्याला येथे गेले होते. पण कोरोना मुळे लाॅकडाऊन जाहीर झाले अन जिल्हाबंदीही झाली. त्यामुळे या दोघांना पुण्यात येता आले नाही. राजीव व प्रिया दोघेही तिकडेच अडकले आहेत.
राधा यांना प्रियाची चिंता वाटू लागली, त्यामुळे त्यांनी राजीवला प्रियाशी मोबाईलवर काही वेळ बोलू देण्याची विनंती केली. पण याबबत न्यायालयाचा आदेश नाही म्हणून राजीवने परवानगी नाकारली. त्यामुळे राधा यांनी तातडीच्या प्रकरणामध्ये कौटूंबीक न्यायालयात ईमेल द्वारे अर्ज केला. त्यावर कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश हितेश गणात्रा राधा व राजीव यांचे व्हिडिओ काॅलींगद्वारे समुपदेशन करण्यास सांगितले. त्यानंतर ही राजीव मुलीशी बोलू न देण्याचा पवित्र्यावर ठाम राहिले. त्यामुळे कौटुंबिक न्यायालयाने राजीव यांना त्यांचे लेखी म्हणणे मांडण्यास सांगितले.
दोन्ही पक्षकारांच्या वकिलांनी ई-मेलद्वारे लेखी युक्तीवाद केला. न्यायाधीश हितेश गणात्रा यांनी शुक्रवारी (ता.१७) रोजी दोन्ही पक्षाचे लेखी म्हणणे आणि लेखी युक्तिवाद यांचा विचार करत निर्णय दिला. यात दर आठवड्यामध्ये रविवारी, बुधवारी आणि शुक्रवारी दुपारी १२.३० ते १.०० दरम्यान दहा मिनिटांसाठी व्हिडीओद्वारे राधा यांना मुलीशी बोलण्याची परवानगी दिली.
राधा यांचे वकील अॅड. भूषण कुलकर्णी म्हणाले, "लाॅकडाऊन असूनही तातडीच्या प्रकरणात याची सुनावणी झाली. कोरोनामुळे चिंताग्रस्त आईला या निर्णयामुळे मोठी दिलासा मिळाला आहे.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.