esakal | कोरोनाच्या लढ्यात उद्धव-राज 'साथ-साथ" 
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनाच्या लढ्यात उद्धव-राज 'साथ-साथ" 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात राजकीय भाऊबंदकी रंगल्याचे महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिले. पण सध्या राज्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे या संकटाचा धीरोदात्तपणे सामना करत आहेत.

कोरोनाच्या लढ्यात उद्धव-राज 'साथ-साथ" 

sakal_logo
By
संजय मिस्कीन

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यात राजकीय भाऊबंदकी रंगल्याचे महाराष्ट्राने आजपर्यंत पाहिले. पण सध्या राज्यावर कोरोनाचे महाभयंकर संकट असताना मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे या संकटाचा धीरोदात्तपणे सामना करत आहेत. अशावेळी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवत आणि भाऊबंदकी ला ही बगल देत बंधुत्वाच्या नात्याने उद्धव यांना साथ देण्याचा निर्धार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

राजकीय भूमिकेवरून या दोन्ही भावंडात कायम मतभेद राहिले आहेत. पण संकटाच्या काळी यांच्यातील मतभेद हे कायम संपल्याचे दिसते. मतभेद असले तरी मनभेद नाहीत असाच एक संदेश आतापर्यंत उद्धव आणि राज यांनी दिला आहे.

Lockdown2.0 : आता एक नाही तीन दिवसांचा जनता कर्फ्यू

कोरोनाच्या संघर्षात सर्वच राजकीय पक्षाचे नेते सरकारला सहकार्य करण्यास तयार असले तरी काही विरोधी पक्षांची भूमिका मात्र राजकीय कुरघोडी करण्याचीच दिसते. अशावेळी राज ठाकरे यांनी मात्र उद्धव यांच्याशी सतत समन्वय साधला असून सूचना करणं शिफारशी करणे आणि या संघर्षात कुठल्याही प्रकारे राजकीय मतभेदातून विसंवाद राहणार नाही याची खबरदारी घेणे हे अगत्याने पाळल्याचे दिसते. म्हणूनच उद्धव ठाकरे यांनी  लोकसंवाद साधताना  राज यांचा उल्लेख अत्यंत आदराने उल्लेख  केला.

'या संकटात सगळेच सहकार्य करत असल्याचे सांगताना राज तर सोबत आहेच.. त्याच्याशी कायम चर्चा होतेच आहे. तो पण सरकारला चांगल्या सुचना करत आहे.'  असे आपुलकीचे शब्द उद्धव यांनी उच्चारले. राज यांनीही उद्धव यांच्याशी चर्चा झाल्याचे सांगितले होतेच. कधी दूरध्वनीवरून कोरोना व सरकारी उपाययोजना या  विषयावर दोन्ही भावंडात संवाद होतो. हे एक चांगले संकेत असल्याची राजकीय चर्चा आहे. आज राज यांनी विविध उपाय योजना संदर्भात उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले.

मोठी बातमी - शालेय 'फी'बाबत वर्षा गायकवाड यांचा मोठा निर्णय, दिल्यात 'या' सूचना...

अशा कठीण प्रसंगात या दोन्ही भावंडामधला आपुलकीचा धागा पुन्हा एकदा घट्ट बंधनात बांधल्याचेच चित्र दिसते. या अगोदरही ही उद्धव ज्या वेळी आजारी पडले होते त्यावेळी राज कोकणचा दौरा सोडून अर्ध्या रस्त्यातून परत मागे फिरले होते.  स्वतः गाडी चालवत हॉस्पिटलमधून उध्दव यांना घेवून ते मातोश्रीला आले. हे चित्र या दोन्ही भावांमधील राजकारण विरहित बंधुत्वाचे नातं अधोरेखित करते. त्याच पद्धतीने मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या वरील संकट दूर करण्याची धुरा खांद्यावर घेतली असताना राजकारणाच्या कुरघोडीतून त्यांना कुठलीही अडचण होऊ नये यासाठी राज यांनी अत्यंत भावनिक नात्याने त्यांच्याशी सहकार्य करण्याची सुरुवात केली आहे. 

during this crucial period of corona relation between raj and uddhav thackeray are becoming stronger 

loading image