पुणे : ड्रोन कँमेरा वापरताय सावधान, 'यांची' परवानगी आवश्यक!

ड्रोन कॅमेरा वापरासाठी जिल्हाधिकारी यांची परवानगी आवश्यक अन्यथा कँमेरा जप्त होऊन होणार कारवाई.
Drone
Dronesakal
Updated on: 

नसरापूर : संपूर्ण पुणे जिल्हा ग्रामीण भागात ड्रोन कॅमेरा द्वारे छायाचित्रण करणारे व्यवसायिक, खाजगी व्यक्ती, इव्हेंट मॅनेजमेंट, संस्था यांना त्यांचे छायाचित्रणात ड्रोन कॅमेराचा वापर करावयाचा असल्यास त्याची पूर्व माहिती संबंधित पोलिस स्टेशन ला ७ दिवसांपूर्वी कळवून जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांची रीतसर परवानगी घेणे बाबत बंधन घालण्यात आले आहे.यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेला आहे.(Permission required for drone camera)

Drone
पुणे : तृतीयपंथीयांसाठी होणार स्वतंत्र स्वच्छतागृहे

संपूर्ण पुणे ग्रामीण जिल्ह्यात महत्त्वाची धार्मिक स्थळे,धरणे, केंद्रीय संस्था असून वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचना तसेच गोपनीय माहितीनुसार दहशतवादी कारवायांमध्ये ड्रोन कॅमेराद्वारे टेहाळणी होऊन त्याचा अतिरेकी कारवायांमध्ये उपयोग केला जाण्याची शक्यता असल्याबाबत कळविण्यात आलेले आहे या व्यतिरिक्त पुणे ग्रामीण जिल्ह्यात ठिकठिकाणी होणाऱ्या धार्मिक सोहळे, लग्नसमारंभ,राजकीय सभा किंवा इतर कार्यक्रम मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांचा समावेश असतो या ठिकाणी ड्रोन कॅमेराद्वारे छायाचित्रण होऊन त्याचा दुरुपयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही याकरीता ड्रोन कॅमेरा चा छायाचित्रणाकरीता वापर करणाऱ्या संस्थांनी व आयोजकांनी त्याबाबतची पूर्व माहिती स्थानिक पोलिस स्टेशनला देणे आवश्यक आहे जेणेकरून त्याची वेळीच पडताळणी करून त्याबाबतची सत्यता पटवून कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेता येईल.

Drone
पुणे : सायबर चोरीच्या वेगवेगळ्या घटनांमध्ये १५ लाखांना गंडा

कार्यक्रम किंवा इतर प्रयोजनासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करावयाचा असल्यास त्याची माहिती ७ दिवस अगोदर त्या भागातील पोलिस ठाण्याची गोपनीय शाखा व पोलिस स्टेशन येथे देऊन पोलीस स्टेशन कडील ना-हरकत दाखला घेणे बंधनकारक करण्यात आले आहे पोलिस ठाण्याचा ना हरकत दाखला नागरिकांनी त्यांचे विनंती अर्जासोबत जोडून जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांचेकडून रीतसर परवानगी घ्यावी लागणार आहे अन्यथा विनापरवानगी ड्रोन कॅमेराचा वापर होत असलेबाबत माहिती मिळाल्यास किंवा निदर्शनास आलेस जिल्हाधिकारी पुणे यांचे आदेशाचा अवमान केला म्हणून संबंधित सर्व साहित्य जप्त करून प्रचलित कायद्यानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.राजगड पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन पाटिल यांनी ही या बाबत ठाण्याअंतर्गत कार्यक्षेत्रासाठी निवेदन प्रसिध्द केले असुन सर्व नागरीकांनी याची दखल घेऊन परवानगी शिवाय ड्रोन कँमेराचा वापर करु नये असे अवाहन केले आहे.(Drone Camera)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MPSC Agitation In Pune Muralidhar Mohol Questions Students On Protest Restart After Meeting With Maharashtra Government
Alandi Indrayani River Pollution Sparks Concern Before Kartiki Wari With Sewage And Dead Fish In The River
MPSC Students Protest in Pune Leaders Extend Support as Students Differ Over Objective and Descriptive Exam Pattern
Sharad Pawar
Marathi News Esakal
www.esakal.com