पिंपरी-चिंचवड शहरात लवकरच वैयक्‍तिक प्रॉपर्टी कार्डची योजना

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

फ्लॅट, बंगल्याची खरेदी-विक्री करताना अनेकदा फसवणुकीचे प्रकार होतात. यामुळे त्यांना पूर्णपणे आळा बसणार आहे. काही वेळा फ्लॅट, बंगला बॅंकेकडे गहाण ठेवून अनेक जण कर्ज काढतात. त्या वेळी बॅंक, वित्तीय संस्था यांना संबंधित जागेची तपासणी करण्यासाठी या कार्डचा उपयोग होणार आहे.
- चारुहास कुलकर्णी, सदस्य, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ

पिंपरी - आपला फ्लॅट, बंगल्याची तपशीलवार माहिती आपल्याकडे राहावी, म्हणून लवकरच वैयक्‍तिक प्रॉपर्टी कार्डची योजना सुरू करण्यात येणार आहे. सध्या यासंदर्भातील नियमावली तयार करण्याचे काम सुरू असून, पुढील तीन महिन्यांत त्याला सुरुवात होण्याची शक्‍यता आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तत्कालीन राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती. मात्र, त्याची नियमावली अद्याप तयार न झाल्याने या योजनेची सुरुवात होऊ शकली नाही. आता नियमावली तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. वैयक्‍तिक पातळीवर दिल्या जाणाऱ्या प्रॉपर्टी कार्डसाठी फ्लॅटधारकाकडून एक हजार रुपये आकारण्याचे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे. भूमी अभिलेख विभागाकडे अर्ज केल्यानंतर साधारणपणे एक ते दीड महिन्यात हे कार्ड देण्यात येणार आहे.

पुणे : सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक; अंगावरुन ट्रक गेल्याने तरुणाचा मृत्यू
 
असे असेल कार्ड
फ्लॅट, बंगला असणाऱ्या नागरिकांसाठी करण्यात येणाऱ्या प्रॉपर्टी कार्डमध्ये संबंधित जागेची सर्व माहिती असेल. त्यात मालकाचे नाव, बांधकाम क्षेत्र, युनिट क्रमांक, बांधकाम परवानगी दिलेल्या संस्थेचे नाव, इमारतीच्या बांधकामाचे वर्ष, जागेच्या मूळ मालकाचे नाव, इमारतीचा पुनर्विकास झाला असल्यास त्याचा तपशील असणार आहे. शेतजमिनीच्या मालकीची नोंद असणारा सात बारा उतारा असतो. तशाच प्रकारे घराचा मालकी हक्‍क या कार्डच्या माध्यमातून मिळणार आहे.
 
सोसायट्यांनो, प्रॉपर्टी कार्ड काढा 
सोसायट्यांसाठी प्रॉपर्टी कार्ड काढण्याची योजना सुरू झाली असून, आतापर्यंत शहरातील दोनशे सोसायट्यांनी त्याचा लाभ घेतला आहे. सोसायटीचे प्रॉपर्टी कार्ड     असले तर वैयक्‍तिक प्रॉपर्टी कार्ड काढणे फ्लॅट आणि बंगलेधारकांना सोईस्कर  होणार आहे. त्यामुळे शहरातील सोसायट्यांनी प्रॉपर्टी कार्ड काढण्यासाठी पुढे येण्याची आवश्‍यकता आहे.

३५०० सोसायट्यांची संख्या
सुमारे ३,००,००० फ्लॅटची संख्या 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Personal property card scheme soon in Pimpri Chinchwad city