पुणे : सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला ट्रकची धडक; अंगावरुन ट्रक गेल्याने तरुणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

  • सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला भरधाव ट्रकची धडक 
  • अंगावरुन ट्रक गेल्याने दुचाकीवरील तरुणाचा मृत्यु 

पुणे : भरधाव ट्रकने सिग्नलला थांबलेल्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. त्यामुळे दुचाकीवर पाठीमागे बसलेला तरुण खाली पडून ट्रकच्या चाकाखाली येऊन मृत्यु झाला. हा अपघात मंगळवारी रात्री आठ वाजता कात्रज येथील जुन्या बसथांब्याजवळ घडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

निलेश लक्ष्मण दौंड (वय 25, रा. पुण्याई बिल्डिंग, भारती विद्यापीठ परिसर, कात्रज) असे अपघातात मृत्यु झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी लहु कोंढाळकर (वय 28, रा. आंबेगाव खुर्द) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाविरुद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व त्यांचा मित्र निलेश दौंड असे दोघेजण फिर्यादीच्या दुचाकीवरुन घरी जात होते.

पाकिस्तानचा भारतीय संविधान जाळण्याचा कट

दरम्यान, त्यांची दुचाकी कात्रज जुना बस थांब्याजवळील चौकात सिग्नल लागल्याने तेथे रस्त्याच्याकडेला थांबले. त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने सिग्नल तोडून डावीकडे मांगडेवाडीच्या रस्त्याला वळण घेतले. त्यावेळी ट्रकची धडक दुचाकीला बसले. त्यामुळे फिर्यादीच्या पाठीमागे बसलेले निलेश दौंड हे रस्त्यावर खाली पडले. त्यानंतरही ट्रकचालकाने ट्रक न थांबवता पुढे नेली. तसेच चौकातच ट्रक मागे पुढे केली, त्यामुळे रस्त्यावर पडलेल्या दौंड यांच्या अंगावरुन ट्रकच्या डाव्या बाजुचे चाक गेले. त्यामध्ये ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यु झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Young man dies in accident in katraj Chowk Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: