Historical well discovered during excavation in the Shahadwal Baba Dargah area
sakal
विश्रांतवाडी - येरवडा येथील शहादवलबाबा दर्गा परिसरात उड्डाणपुलाच्या कामासाठी सुरू असलेल्या खोदकामात पेशवेकालीन ऐतिहासिक विहीर उघडकीस आली आहे. या विहिरीत आजही पाणी असून, नैसर्गिक झरेही जिवंत आहेत. मात्र, उड्डाणपुलाच्या कामात ही ऐतिहासिक वास्तू बुजवली जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांमधून चिंता व्यक्त होत आहे.