पुण्यातील पेठा सील; गुलटेकडी, कोंढव्यातील प्रवेशमार्ग बंद 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020


परिणामी, या भागांतील प्रवेशमार्ग बंद करून लोकांची ये- जा थांबविली जाणार आहे. त्यातून अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्यांना वगळले आहे. त्यामुळे दवाखाने, औषध दुकाने, किराणा दुकाने आणि अत्यावश्‍यक सेवा सुरू राहतील. पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय लागू राहील. 
 

पुणे : कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळल्यामुळे शहरातील सर्व पेठांसह मार्केटयार्ड- गुलटेकडी, कोंढवा, सहकारनगर, पुणे रेल्वेस्थानक, कर्वे रस्त्याचा काही भाग महापालिकेने सोमवारी मध्यरात्रीपासून "सील' करण्याचा निर्णय घेतला आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
परिणामी, या भागांतील प्रवेशमार्ग बंद करून लोकांची ये- जा थांबविली जाणार आहे. त्यातून अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्यांना वगळले आहे. त्यामुळे दवाखाने, औषध दुकाने, किराणा दुकाने आणि अत्यावश्‍यक सेवा सुरू राहतील. पुढील आदेश येईपर्यंत हा निर्णय लागू राहील. 

Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव
दुसरीकडे, शहराच्या अन्य काही भागांतही गरजेनुसार अशाच प्रकारची कार्यवाही होऊ शकते, असा अंदाजही महापालिका प्रशासनाने वर्तविला आहे. "सील' केलेल्या भागांचा तपशिल पोलिसांना देण्यात आला आहे. त्यानुसार काटेकोरपणे अंमलबजावणी होईल. तरीही, लोकांची रस्त्यांवर वर्दळ दिसल्यास कठोर कारवाई होईल, असे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी सायंकाळी स्पष्ट केले.

मोठी बातमी : मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दारावर कोरोनाची धडक

कोरोनाला आवाक्‍यात आणण्यासाठी महापालिकेने कठोर पावले उचलली आहेत. त्याचाच भाग म्हणून पेठांसह काही भागात लोकांना ये-जा करण्यास बंदी घातली आहे. परंतु, अत्यावश्‍यक सेवांना वगळण्यात आले असून, कोरोनाचा संसर्ग वाढण्याच्या शक्‍यतेने काही भाग "सील' आल्याचे गायकवाड यांनी यांनी सांगितले. 

Coronavirus : महाराष्ट्रात २२ जिल्ह्यांत कोरोनाचा प्रभाव

सील केलेला भाग 
सर्व पेठा, पुणे रेल्वेस्थानकचा काही भाग, राजाबहादूर मील रस्ता (आरटीओ), पाताळेश्‍वर मंदिर, लोकमान्य टिळक चौक (अलका चौक, खंडुजीबाबा चौक, पूना हॉस्पिटल, शास्त्री रस्ता पर्वती पायथा, मित्र मंडळ चौक, गुलटेकडी मार्केट यार्ड, डायस प्लॉट, टिंबर मार्केट, जनरल पोस्ट ऑफिस (जीपीओ), 

काय सुरू राहणार 
दवाखाने, मेडिकल, डेअरी, किराणा दुकाने, भाजीपाला दुकाने, गुलटेकडी येथील मार्केटयार्ड (पालेभाज्या, भुसार बाजार), अत्यावश्‍यक सेवा 

यावर बंदी 
घराबाहेर पडणे (अत्यावश्‍यक काम वगळता), आपल्या भागातून दुसऱ्या परिसरात जाणे, वाहतूक
Corona Virus : शासनाच्या मदतीसाठी गिर्यारोहकांचा टास्क फोर्स ​
नागरिकांना आयुक्तांचे आवाहन 
संबंधित भागामध्ये जाणे टाळा 
नियमित व्यवहार लांबणीवर टाका 
त्या भागामध्ये जावेच लागणार असल्यास तिथे मास्क वापरा 
संबंधित भागातील रहिवाशांसाठी मास्क अत्यावश्‍यक. 

"भीतीपोटी नव्हे तर खबरदारी म्हणून "सील' केले आहे. या काळात प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पाडू आणि पुणेकरांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या आणि सहकार्य करा.'' 
- मुरलीधर मोहोळ, महापौर 

या भागांतील (सील) रहिवाशी अगदी घरातही मास्कचा वापर करावा. घरातून बाहेर येऊ नये. पुढचे काही दिवस खूप काळजी घ्यावयाची आहे. त्यामुळे लोकांना "सील'च्या माध्यमातून घातलेली बंधने पाळावीत.'' 
- शेखर गायकवाड, आयुक्त, महापालिका

सील म्हणजे काय? 
साथरोग प्रतिबंध अधिनियम 1897 नुसार (एपिडमिक ऍक्‍ट) जिल्हाधिकारी किंवा महापालिका आयुक्तांना शहर, गाव 'सील' करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार 'सील' केलेल्या भागातून ये-जा करण्यास पूर्णपणे बंदी असते. मात्र, त्यातून अत्यावश्‍यक सेवा आणि त्यासंबंधीच्या घटकांवर मर्यादा येत नाहीत. या कायद्यानुसार पुणे शहरातील सर्व पेठासह कोंढवा, महर्षीनगर ते राजाबहादूर मिल रस्त्यावरील (आरटीओ) कार्यालयापर्यंतचा भाग सील करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Peth area is sealed in Pune and Gateway are Closed of Gulchadi Kondhwa