
कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक चटके सोसत असलेल्या नागरिकांना आता इंधन दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. ‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून सुसाट असलेला पेट्रोल दरवाढीचा मीटर नव्वद रुपयांच्या घरात पोचला आहे. शहरात शनिवारी पेट्रोलची किंमत ८९.४४ रुपये झाली आहे.
पुणे - कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत आर्थिक चटके सोसत असलेल्या नागरिकांना आता इंधन दरवाढीची झळ सोसावी लागत आहे. ‘अनलॉक’ सुरू झाल्यापासून सुसाट असलेला पेट्रोल दरवाढीचा मीटर नव्वद रुपयांच्या घरात पोचला आहे. शहरात शनिवारी पेट्रोलची किंमत ८९.४४ रुपये झाली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एक जूनपासून लॉकडाउनमध्ये देण्यात आलेल्या काही सवलतीनंतर पेट्रोल आणि डिझेलची विक्री वाढली होती. त्यामुळे तेव्हापासून इंधनाचे दर सातत्याने वाढत आहेत. राज्यात पेट्रोल आणि डिझेलवर आकारल्या जाणाऱ्या मूल्यवर्धित करावर (व्हॅट) एक जून रोजी राज्य सरकारने अधिभार वाढवला आहे. तसेच सुरुवातीच्या लॉकडाउनमुळे तीन महिने इंधन घेऊन आलेले जहाज समुद्रात थांबून होते. त्याचाही खर्च वाढला होता. तसेच देशात इंधनाची मागणी एकदम वाढली होती. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर जूनमध्ये अचानक वाढले होते. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्ये दरवाढ काहीशी मंदावली होती. मात्र आता नोव्हेंबर अखेरपासून पुन्हा दरवाढ होत आहे. गेल्या १५ दिवसांत पेट्रोल दीड रुपयांनी महागले आहे.
व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेशाला अद्याप प्रतिक्षा
तर तीन रुपयांनी किंमत कमी होतील
राज्यात पडलेल्या दुष्काळामुळे मागील सरकारने इंधनावर तीन रुपयांचा दुष्काळ कर लावला होता. आता मात्र राज्यात दुष्काळाची परिस्थिती नाही. त्यामुळे तो कर मागे घेतल्यास इंधनाचे दर तीन रुपयांनी कमी होईल. त्यातून वाहन चालकांना नक्कीच दिलासा मिळेल, असा विश्वास या क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला.
जूनमध्ये सर्वाधिक झळ
दुचाकीसह नियमित चारचाकी वाहनाचा वापर करणाऱ्या वाहनचालकांच्या खिशाला बसणारी चाट जून महिन्यात १८.३५ रुपयांनी वाढली आहे. जूनमध्ये डिझेलच्या किमतीत १०.३६ तर पेट्रोल ७.९९ किमतीत रुपयांनी वाढ झाली होती. कोरोना पूर्वीच्या तुलनेत सध्या ७० टक्के पेट्रोल-डिझेलची दररोज विक्री होत आहे.
थंडी पडत असलेल्या देशात उष्णतेसाठी अनेक साधने वापरली जातात. ती पेट्रोल-डिझेलवर चालणारी असतात. त्यामुळे दरवर्षी या काळात तेथील मागणी वाढल्याने इंधनाचे दर उसळतात. मात्र, पेट्रोल ९० रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता कमी आहे. येत्या चार ते पाच दिवसांत दर स्थिर होतील व थंडी कमी होईल त्यानुसार दरही काहीसे उतरतील.
- अली दारूवाला, प्रवक्ते, ऑल इंडिया पेट्रोल डीलर्स असोसिएशन
दरवाढीची कारणे
1) युरोपीय देशांकडून वाढलेली इंधनाची मागणी
2) कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत ५० डॉलरच्या घरात
3) आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरची वाढलेले मूल्य
Edited By - Prashant Patil