

Assault on Fuel Station Staff: Police Arrest Accused With Criminal Records
Sakal
विश्रांतवाडी: येरवड्यातील गुंजन चौकात विलास पेट्रोलियम येथील कर्मचाऱ्याला मारहाण करून दहशत माजविणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी अवघ्या २४ तासांत बेड्या ठोकल्या. या प्रकरणी कृष्णा प्रभाकर नाईक (वय २५) आणि अक्षय ऊर्फ आबा सुदाम जमदाडे (वय २५) यांना अटक करण्यात आले आहे. हे दोघेही गांधीनगर, येरवडा येथील रहिवासी असून यांच्यावर यापूर्वीही गुन्हे नोंद असल्याची माहिती पोलिसांनी दिली.