Jogendra Kawade
sakal
दौंड - सातारा जिल्हातील फलटण उप जिल्हा रूग्णालयातील महिला डॅाक्टर आत्महत्या प्रकरणी शक्य असेल तर विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) तपास झाला पाहिजे. हे प्रकरण दडपण्यासाठी दबाव आणणारे आणि पडद्यामागील सूत्रधारांचा देखील सखोल तपास आणि कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी लाँग मार्च आंदोलनाचे प्रणेते तथा पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी केली.