
पुणे - राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला असला, तरी अद्याप बी. फार्मसी आणि फार्म. डी या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची प्रक्रिया संथगतीने सुरू आहे. त्यामुळे औषधनिर्माणशास्त्रातील अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष प्रवेशासाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. या प्रवेश प्रक्रियेतील तात्पुरती गुणवत्ता यादी सहा सप्टेंबर, तर अंतिम गुणवत्ता यादी १२ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे.