.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
New Pharmacy recruitment and promotion rules 2025 in India
पुणे : देशभरातील औषधनिर्माण (फार्मसी) सेवांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी आणि शासकीय रुग्णालयांमधील रुग्णसेवा अधिक सक्षम करण्यासाठी ‘भारतीय औषधनिर्माण परिषदे’ने (पीसीआय) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीने ‘औषधनिर्माता भरती, पदोन्नती आणि सेवा नियम, २०२५’ लागू करण्यात आले असून, त्याची अधिकृत अधिसूचना भारताच्या शासकीय राजपत्रात प्रसिद्ध करण्यात आली आहे. औषध वितरण प्रणाली अधिक निर्दोष करणे, तसेच औषधनिर्मात्यांची भरती प्रक्रिया, पदोन्नती आणि सेवेच्या अटींचे नियमन करणे, हा या नव्या नियमावलीचा प्रमुख उद्देश आहे.