
बारामती शहर पोलिसांनी सावकारीच्या विरोधात सुरु केलेल्या मोहिमेची माहिती कर्जदाराला असल्याने त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले व पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांची भेट घेतली. पोलिसांना प्रकरणाचे गांभीर्य समजल्यावर पोलिस ठाण्यातून संबंधित सावकाराला चौकशी करायची आहे, तुम्ही पोलिस ठाण्यात या....इतकाच निरोप गेला.
बारामती : प्रशासनाने मनात आणल तर काय घडू शकते याचे उदाहरण बारामतीत नुकतेच पाहायला मिळाले. बारामती तालुक्यातील एका सावकाराचा हा किस्सा. सावकारीच्या एका प्रकरणात पाच लाखांच्या बदल्यात 19 लाख रुपये दिल्यानंतरही आणखी पाच लाखांची सावकाराची मागणी सुरु होती, कर्जदाराची जमीनही खरेदीखत करुन नावावर करुन घेतली आणि तरीही दमदाटी सुरुच होती.
बारामती शहर पोलिसांनी सावकारीच्या विरोधात सुरु केलेल्या मोहिमेची माहिती कर्जदाराला असल्याने त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले व पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांची भेट घेतली. पोलिसांना प्रकरणाचे गांभीर्य समजल्यावर पोलिस ठाण्यातून संबंधित सावकाराला चौकशी करायची आहे, तुम्ही पोलिस ठाण्यात या....इतकाच निरोप गेला.
- रशियाच्या लशीची पुण्यात मानवी चाचणी
हा निरोप म्हणजे जणू काही जादूची कांडीच ठरला. पोलिसांनी सावकारांच्या विरोधात उचलेल्या पावलांची माहिती असलेल्या संबंधित सावकाराने थेट कर्जदाराशी संपर्क करत कोणतीही रक्कम देऊ नका, तुमची जमीन स्वखर्चाने पुन्हा तुमच्या नावावर करुन देतो, पण माझ्याविरुध्द तक्रार काही करु नका, अशी गळ घातली. जी गोष्ट गेले अनेक महिने कर्जदाराकडून होऊ शकत नव्हती ती पोलिसांच्या एका फोनने काही तासातच पूर्ण झाली. कर्जदाराला त्याची हक्काची जमीन तर मिळालीच पण हिशेबात नसलेल्या रकमेचा तगादाही संपून गेला.
संबंधित सावकाराने जवळपास 60 लाख रुपये किंमतीची ही जमीन कायम खूष खरेदी रद्दलेख दस्ताने ताब्यासह परत करुन कायम खुष खरेदी खत व्यवहार रद्द केला. पोलिसांच्या प्रभावी कामगिरीमुळे आज सावकारांचा जाच कमी होऊ लागल्याचे चित्र बारामती परिसरात दिसू लागले आहे. हेही त्याचेच एक उदाहरण म्हणावे लागेल. सन 2014 मध्ये घेतलेल्या पाच लाखांच्या बदल्यात चार वर्षात तब्बल 19 लाखांची वसूली केल्यावरही सावकाराने जमीनही स्वताःच्या नावावर करुन घेत कर्जदाराची मोठी पिळवणूक केली होती. मात्र पोलिसांच्या दणक्याने त्याने वेळेवर पावले उचलत पोलिस कारवाईतून मान सोडवून घेतली.
- रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कर्जदारांनी पोलिसांशी संपर्क करावा...
ज्या कर्जदारांना सावकारांकडून मानसिक व शारिरीक त्रास दिला जात असेल अशा अवैध सावकारांविरुध्द लोकांनी निर्भयपणे पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी केले आहे.
- Tell Me Your Story : डिप्रेशन दूर करायचे 'राज'; पुण्यातील तरुणाचे कौतुकास्पद 'मिशन'