esakal | रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी
sakal

बोलून बातमी शोधा

Ranjitsinh_Disale

शिक्षणाचे आधुनिकीकरण होत आहे, पण आधुनिकतेच्या व्याख्येत नेहमी प्रमाणे ह्याही वेळेस गावे वंचित आहेत. यात बदल गरजेचं आहे. त्यासाठी रणजितसिंह डिसले यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने "शिक्षण सुधारणा समिती" स्थापन करावी.

रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्र भूषण' द्या; मुख्यमंत्र्यांकडे मागणी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 
युनिक्सो आणि लंडनस्थित वार्की फाउंडेशनने जागतिक उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार  दिला. त्यामुळेच महाराष्ट्राची शान वाढली असून, राज्य सरकारने डिसले यांना 'महाराष्ट्र भूषण'  पुरस्कार देऊन गौरव करावा,  तसेच जिल्हा परिषद शाळांची स्थिती सुधारण्यासाठी डिसले यांची समिती स्थापन करून शिक्षकांना प्रशिक्षण द्यावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

रशियाच्या लशीची पुण्यात मानवी चाचणी

स्टुडंट हेल्पिंग युनिटी संघटनेच्या अध्यक्षा आकांक्षा चौगुले यांनी ही मागणी केली आहे. महाराष्ट्रात महात्मा जोतिबा फुले यांनी ज्योत लावली आणि तिचा भारतभर प्रकाश पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे सारख्या महापुरुषांनी शिक्षण तळागाळापर्यंत पोहचवले. सध्या राज्यात विद्यार्थी संख्येचे कारण देऊन अनेक ठिकाणच्या सरकारी शाळा बंद केल्या जात आहे. कुठल्या शाळेचे पत्रे गायब आहेत तर कुठल्या शाळेला लग्नाचे मंगलकार्यालय केलं आहे.

रक्तपेढ्यांनी जादा शुल्क आकारल्यास कारवाई

शिक्षणाचे आधुनिकीकरण होत आहे, पण आधुनिकतेच्या व्याख्येत नेहमी प्रमाणे ह्याही वेळेस गावे वंचित आहेत. यात बदल गरजेचं आहे. त्यासाठी रणजितसिंह डिसले यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने "शिक्षण सुधारणा समिती" स्थापन करावी. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रातील उत्कृष्ट शिक्षकांची निवड करून दरवर्षी एक हजार शिक्षकांना प्रशिक्षीत करणारा प्रकल्प सुरू करावा.  त्यातून सरकारी शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावेल. 

उद्योजकतेकडे करिअर म्हणून पाहा

ग्लोबल टिचर पुरस्कार मिळवणारे रणजितसिंह डिसले हे देशातील एकमेव शिक्षक आहेत. या पुरस्काराने महाराष्ट्राची मान उंचावली आहे. त्यासाठी त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात यावे. हा त्यांचा योग्य सन्मान ठरेल, अशी मागणी चौगुले यांनी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

loading image