पुणे - ‘प्री-वेडिंग शूट’च्या बहाण्याने बोलावून चोरट्यांनी चेन्नईतील एका छायाचित्रकाराचा कॅमेरा, लेन्स असा १२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरातील एका हॉटेलमध्ये घडली. .या प्रकरणी छायाचित्रकार राघवेंद्र एम. राजू गोकूळ (वय २९, रा. शांतिनगर, चेन्नई, तमिळनाडू) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून अनिल अजाबराव बनकर (वय ४०, रा. दोडकी, जि. नागपूर) आणि कोंडा वामशी दाथु (रा. निजामाबाद, तेलंगण) या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे..पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी राघवेंद्र यांना पुणे आणि गोव्यात ‘प्री-वेडिंग शूट’ करायचे आहे. त्यासाठी तीन लाख रुपये तसेच, निवास आणि प्रवास खर्चाची व्यवस्था करण्यात येईल, असे सांगितले. त्यानंतर चोरट्यांनी त्यांना ऑनलाइनद्वारे १९ हजार रुपये पाठविले. राघवेंद्र आणि त्यांचा भाऊ गोविंदराजू २२ जानेवारीला मध्यरात्री चेन्नईहून विमानाने पुण्यात आले. पुणे स्टेशन परिसरातील एका हॉटेलमध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था केली होती..चोरट्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी राघवेंद्र यांच्या मोबाईलवर संपर्क साधून कोंढवा परिसरात बोलावून घेतले. राघवेंद्र आणि त्यांचा भाऊ मोटारीतून तेथे गेले. तेव्हा चोरट्यांचा मोबाईल बंद होता. त्यामुळे काही वेळ थांबून ते पुन्हा हॉटेलवर परतले. त्यावेळी त्यांच्या खोलीतून तीन कॅमेरे, लेन्स आणि इतर साहित्य चोरीस गेल्याचे आढळून आले..राघवेंद्र यांनी हॉटेल व्यवस्थापकाला सांगून सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. तेव्हा एकजण खोलीतून कॅमेरे आणि साहित्य चोरून पसार झाल्याचे दिसून आले. हॉटेलमध्ये नोंद करताना चोरट्यांनी आधारकार्ड दिले होते. त्यावर चोरट्यांचा निजामाबाद आणि नागपूरमधील पत्ता होता. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश चव्हाण करीत आहेत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.