Video : अशक्य काही नसतं हो; दिव्यांग तरुणाने तयार केला स्वत:चा ब्रँड

शरयू काकडे
Tuesday, 19 January 2021

कोल्हापुरमधील इचलकरंजी शहरातील वरुण बरगाळे आणि त्याची पत्नी श्रुती दोघेही दिव्यांग. दोघांनीही ऐकता येत नाही, ना बोलता येते तरीही दोघांनी मिळून आज स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. सर्व सामन्यांसारखेच दिव्यांग व्यक्तीही उत्तम दर्जाचे काम करु शकतात हे या दोघांनी सिध्द करुन दाखवले आहे​

पुणे : आजकाल वेगवेगळे स्टार्टअप, बिझनेस सुरु होत असतात. सर्व सामान्य माणूस जेव्हा व्यवसायामध्ये उतरतो तेव्हा त्याला अनेक अडचणींचा सामाना करावा लागतो. पण जर एखादा ऐकू न येणारा-बोलू न शकणारा व्यक्ती असे स्वप्न पाहतो तेव्हा हे अगदी अशक्य वाटते...हो ना, पण अशक्य वाटणारी ही गोष्ट शक्य करुन दाखवली आहे कोल्हापुरच्या एका दिव्यांग तरुणाने. 

कोल्हापुरमधील इचलकरंजी शहरातील वरुण बरगाळे आणि त्याची पत्नी श्रुती दोघेही दिव्यांग. दोघांनीही ऐकता येत नाही, ना बोलता येते तरीही दोघांनी मिळून आज स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. सर्व सामन्यांसारखेच दिव्यांग व्यक्तीही उत्तम दर्जाचे काम करु शकतात हे या दोघांनी सिध्द करुन दाखवले आहे. इचंलकरंजीचे उत्तम गुणवत्तेचे कापड वापरुन पांढऱ्या रंगाच्या कपड्यांचा व्यवसाय सुरु केला आहे. या कपड्यांपासून दिव्यांग मुलांनी तयार केलेले पांढऱ्या रंगाचे उत्तम दर्जाचे शर्ट, कुर्ती आणि मास्कची विक्री केली जाते. त्यासाठी त्याने फॅशन डिझाईनिंगचे शिक्षणही घेतले आहे. 

PSI महिला अधिकाऱ्याशी लव्ह मॅटर; पोलिस शिपायाने ठाण्याच्या टेरेसवरुनच मारली उडी​

10 ऑक्टोबर 2018 ला एका कर्णबधीर व्यक्तीच्या घरातून एका शिलाईवर चालू केलेली AWC कंपनी आता स्वतंत्र कंपनी म्हणून प्रस्थापित केली आहे. या कंपनीमध्ये आता 15 मशिन्स आणि 20 कामगारांना रोजगार मिळवून दिला आहे. वरुणने त्याच्यासारख्या दिव्यांग व्यक्तींना देखील आत्मनिर्भर बनविण्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांना त्यांचे कलागुण वापरण्याची संधी मिळवून दिली आहे. पांढऱ्या कपड्यांमध्ये वरुणने स्वत:च ब्रँड तयार केला असून त्याला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुरवातीला फक्त पुरषांसाठीचे कपड्यांचे उत्पादन सुरु होते, आता महिलांसाठी आणि लहानमुलांसाठी पांढऱ्या रंगामध्ये उत्तम कुर्तीं आणि कपड्यांची निर्मिती सुरु केली आहे. आज पुणे, मुंबई, सातारा, नागपुर, हैदराबाद, अहमदनगर, धुळे, जळगाव, नेरुळ असा जवळपास महाराष्ट्र भर हा व्यवसायाची व्याप्ती वाढवली आहे. इतकेच नव्हे तर AWC ची स्वतंत्र वेबसाईट सुरु केली असून जगभर स्वत:ची व्यवसाय पोहचविण्याचे धेय्य त्याने उराशी बाळगले आहे. 

 

प्रेयसीच्या पतीवर प्रियकरानेच केला प्राणघातक हल्ला


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: physically disabled varun bargale stated own White Colths Collection Brand