
कात्रज (पुणे) : मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी ११ वाजता भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने ७ दुचाकी व ८ चारचाकी वाहनांना अक्षरश: चिरडले. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला. मात्र यावेळी पोलिस नाईक रघुनाथ नामदेव जाधव हे अपघातग्रस्तांसाठी देवदूत ठरले.
वेळेवर अॅम्बुलन्स पोहचू शकणार नाही हे लक्षात घेऊन मिळेल त्या वाहनाने रुग्णालयात पाठवण्याची सोय केली. पीकअपने अॅम्बुलन्सची जागा घेतल्याचे यावेळी पाहायला मिळाले. जाधव यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह जखमींना पीकअपने रुग्णालयात पोहोचवण्याचे काम केले.
रघुनाथ जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजकडून नवले पुलाकडे विरुद्ध दिशेने जात असणाऱ्या वाहनांवर कारवाई करत असताना जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अपघात झाल्याची माहिती मिळाली असता ते तात्काळ घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी अपघात झालेल्या ठिकाणी अनेक जखमी अस्थाव्यस्थ पडलेले होते. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक असल्याचे लक्षात आले.
जखमींमध्ये एकाचा हात तुटला होता तर दोघांचा पाय फ्रॅक्चर झाला होता. आणखी काही लोक जखमी अवस्थेत आढळून आले. त्याचबरोबर, घटनास्थळी अॅम्बुलन्स पोहोचू शकणार नव्हती, म्हणून मग सुरुवातीला दोन किरकोळ आणि दोन गंभीर जखमींना नवले रुग्णालयात दाखल केले. जखमींना रुग्णालयात दाखल करताना जाधव यांना त्यांचे सहकारी कुलदीप पवार, रघुनाथ जाधव, मनोहर केंद्रे, तुकाराम झुंजार, बालाजी केंद्रे आदी सहकाऱ्यांची मदत मिळाली. पुढील कारवाई ही भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (वाहतूक शाखा) कृष्णकुमार इंदलकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. भरधाव ट्रकने रस्त्यावरुन जाणाऱ्या ८ ते १० दुचाकींना उडविले, तरीही ट्रक थांबला नाही, त्यापुढेही वेगात जाणाऱ्या ट्रकने ५ ते ६ चारचाकी वाहनांना उडविले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.