
चाकण : पुण्यातील पाईट पापळवाडी येथील कुंडेश्वर देवदर्शनासाठी निघालेल्या पिकअप जीपचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. थेट शंभर फुटावर खोल दरीत जीप कोसळली असून या अपघातात आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून घटनेने एकच खळबळ उडाली आहे.