पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे येथे पिकप टेम्पो-एसटीचा अपघात; १४ जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pickup Tempo ST accident at Eklahare on Pune-Nashik National Highway14 injured

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे येथे पिकप टेम्पो-एसटीचा अपघात; १४ जखमी

मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर एकलहरे (ता.आंबेगाव) येथे पुण्याकडे जात असलेला दुधाच्या पिकप टेम्पोला (एम.एम १४.के.ए.०८८१) पुणे-नाशिक एस.टी (एम.एम १४.बी.टी.४०७९) गाडीने भरधाव चुकीच्या दिशेने जाऊन धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात या दोन्ही वाहनातील एकूण १४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यापैकी एका रुग्णाला पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्यात आले आहे. मंगळवारी (ता.२) दुपारी तीनच्या सुमारास अपघात झाला असून दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे.

विलास तुकाराम हाडवळे (वय ५३), सानिका विलास हाडवळे (वय १८ दोघे रा.राजुरी ता.जुन्नर), स्वाती सुभाष सहाणे (वय ६५ रा.जुन्नर), एस.टी वाहक सुखदेव नामदेव सोनावणे (वय ४९ सिन्नर जि.नाशिक),सुरेखा मलिक गोसावी (वय ५५), रुपाली संजय महागरे (वय ३८ दोघे रा.सारोळा ता.भोर), मयूर प्रकाश मोरे (वय २८ रा.नाशिक), बाजीराव लक्षमण थिगळे (वय ५४ रा.पोहे ता.खेड), सचिन मारुती लोंढे (वय ४० रा.जुन्नर), अजिंक्य परमेश्वर चवरे (वय २१ रा.लोणी राहता जि.नगर), संदीप एकनाथ खरात (चितळी-राहता) हे जखमी एसटीतून प्रवास करत होते. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ.श्वेता गोराणे, डॉ. अलकानंद रेडी, डॉ.प्रियांका चतुर, डॉ.श्रीकांत सोनूणे उपचार करत आहेत. संदीप खरात यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औंद रुग्णालय पुणे येथे पाठविले आहे.

पिकप चालक अनिल निवृत्ती औटी (वय.२४), आनंद दशरथ नाईकोडी, (वय २२ दोघे रा.राजुरी ता.जुन्नर), विजय बाळशिराम जाधव (वय २६ रा.बोरी ता.जुन्नर) हे जखमी पिकप मधून प्रवास करत होते. त्यांच्यावर मंचर येथील सिद्धी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अशी माहिती डॉ. अतुल शिंदे यांनी दिली. मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश डावखर यांनी घटनास्थळी ताबडतोब भेट देऊन जखमींना वैद्यकीय उपचारासाठी मंचरला रवाना केले. एस.टी चालक संजय केदार (सिन्नर आगार) यांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Pickup Tempo St Accident At Eklahare On Pune Nashik National Highway14 Injured

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..