‘पिफ’च्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PIF Invitation to attend  Cannes Festival Festival Hub pune

‘पिफ’च्या कार्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल

पुणे : महाराष्ट्र सरकार व पुणे फिल्म फाउंडेशनतर्फे पुण्यात आयोजित करण्यात येत असलेल्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (पिफ) च्या कार्याची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. येत्या १७ ते २८ मे दरम्यान फ्रान्स येथे होणाऱ्या जगप्रसिद्ध कान्स चित्रपट महोत्सवातील ‘द फेस्टिवल हब’ या विभागात होणाऱ्या एका विशेष चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ‘पिफ’ला निमंत्रण देण्यात आले आहे. या विभागात सहभागी होण्यासाठी निमंत्रण मिळालेला ‘पिफ’ हा भारतातील एकमेव चित्रपट महोत्सव आहे.

‘पिफ’सह दक्षिण कोरियातील बुचेओन इंटरनॅशनल फॅनटास्टीक फिल्म फेस्टिवल, झेक प्रजासत्ताक येथील कार्लोव्ही वरी इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल आणि बीएफआय लंडन फिल्म फेस्टिवल या महोत्सवाच्या प्रतिनिधींना देखील या चर्चासत्रात निमंत्रित करण्यात आले आहे. ‘द न्यू एरा ऑफ फेस्टिवल्स – ऐक्सपांडिंग बियॉंड हायब्रीड’ या विषयावरील हे चर्चासत्र स्थानिक वेळेनुसार सकाळी ११ वाजता कान्स महोत्सवातील मरीना स्टेज रिव्हिएरा येथे होणार आहे. जगभरातील प्रेक्षकांना यात ऑनलाईन पद्धतीने सहभागी होता येणार आहे.

‘‘गेली २० वर्षे आम्ही घेत असलेल्या अविरत प्रयत्नांना सदर निमंत्रणाच्या रुपात मिळालेली ही दाद आम्हाला भविष्यात आणखी चांगले काम करण्याची प्रेरणा देईल. यानिमित्ताने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आमच्या प्रयत्नांची दखल घेण्यात आली आहे, याचा आम्हाला विशेष अभिमान आहे.’’

- डॉ. जब्बार पटेल, संचालक - ‘पिफ’

Web Title: Piff Invitation To Attend Cannes Festival Festival Hub Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top