पुणे - लाखो वारकऱ्यांसह संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यात मुक्कामी येण्यास अवघ्या आठ दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. असे असताना शहरातील रस्त्यांची स्थिती खराब असून, त्यामुळे वारकऱ्यांची वाट खडतर होणार आहे.