पिंपळवंडीला कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जबर जखमी

पिंपळवंडीला कुत्र्यांच्या हल्ल्यात बिबट्या जबर जखमी

जुन्नर - पुणे - नाशिक मार्गावरील पिंपळवंडी- चाळकवाडी ता.जुन्नर येथे मंगळवार(ता.२९) रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास दोन कुत्र्यांनी चढविलेल्या हल्ल्यात बिबटया जबर जखमी झाला. हा बिबटया येथील अनिल सोनवणे यांच्या शेतात बसलेला होता. दोन कुत्र्यांनी एकत्रितपणे केलेल्या हल्ल्यात  बिबट्याच्या तोंडाला व पोटाला मोठया जखमा झाल्या आहेत. तर बिबट्याने केलेल्या प्रतिकारात एका कुत्र्याच्या कानाला व उजव्या पायाला जखम झाली आहे. ही घटना ग्रामस्थांना समजताच त्यांनी पिंपळवंडी येथील प्राणीप्रेमी व सर्पमित्र आकाश माळी यांना येथे बोलवले. 

आकाश माळी आणि काही स्थानिक ग्रामस्थानीं काठीच्या सहाय्याने बिबट्यावर हल्ला करणाऱ्या कुत्र्यांना पळवुन लावून  कुत्र्याच्या हल्ल्यातून बिबट्याची सुटका केली. या परिसरात बिबट्याने शेतकऱ्यांच्या पाळीव जनावरांवर हल्ला केला होता आणि त्यात त्यांचे नुकसान झाले होते. यामुळे संतप्त ग्रामस्थांकडून बिबटयास मारहाण होऊ नये यासाठी माळी यांनी शेतकऱ्यांना समजावून सांगितले. बिबट्याला कोणीही दुखापत करू नये अशी विनंती केली. यानंतर वनविभागाला संपर्क साधला ओतुर वनपरिक्षेत्र विभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले त्यांनी जखमी बिबट्याला पकडले.

या हल्ल्यात बिबट्या जबर जखमी झाला असुन, त्याला पुढील उपचारासाठी तातडीने माणिकडोह येथील बिबट निवारण केंद्रात दाखल केले आहे. बिबट निवारण केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ.अजय देशमुख यांनी सांगितले की, हा दीड वर्षाचा नर बिबट असुन त्यावर उपचार सुरु आहेत पण बिबट्याची प्रकृती खुप नाजुक आहे. या बिबटच्या डाव्या डोळ्याला अगोदरच दुखापत झालेली असुन, तो आजारी असावा. यामुळे तो कुत्र्याच्या हल्यात जखमी झाला.

ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी सचिन रघतवान यांनी सांगितले की हा बिबट्या अगोदर जखमी अथवा आजारी असावा हा कुत्र्याच्या हल्यात जखमी झाला नसावा तो पहिल्या पासुनच जखमी असल्याचे दिसत आहे. तो जखमी कशामुळे झाला असावा याचा शोध घेण्यात येत आहे. पिंपळवंडी परिसरात  बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. अनेकदा बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याची पाळीव जनावरे, कुत्रा बिबट्याचे भक्ष बनले आहेत. वनविभागाने बिबट्या पकडण्यासाठी पिंजरा लावावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे. मात्र वनविभाग सोयीस्कर पणे त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थानिक ग्रामस्थांची भावना झाली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com