

पिंपळगाव (ता.आंबेगाव): विहिरीच्या कपारीत दबा धरून बसलेला बिबट्या
Sakal
मंचर: आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव-खडकी येथे शुक्रवारी (ता. ३) पहाटे विहिरीत पडलेल्या बिबट्याची वनविभागाच्या पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका केली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.