

Junnar News 24 Year Old Durgakumar Gupta Dies After Assault Near Kukadi River Bridge Police Book Two Suspects
sakal
आळेफाटा : पुणे-नाशिक महामार्गावरील पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथील कुकडी नदीच्या पुलावर तरुणाला मारहाण केल्यानंतर तो पुलावरून खाली पडून मृत्युमुखी पडल्याची घटना ९ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री घडली. या प्रकरणी आळेफाटा पोलिसांनी एका २१ वर्षीय तरुणासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १०५ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.