

पिंपरी : विक्रीसाठी गांजा बाळगणाऱ्या एकाला पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. ही कारवाई निगडी येथे करण्यात आली. प्रकाश तुकाराम शिंगे (रा. ओटास्किम, निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. प्रकाश याच्याकडे गांजा असल्याची मिळाली असता पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजार सहाशे रुपये किमतीचा गांजा जप्त केला. हा गांजा त्याने ओटास्कीम येथील एका महिलेकडून विक्रीसाठी आणल्याचे सांगितले.
मारहाणप्रकरणी चौघांवर गुन्हा
पिंपरी : तिघांना शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बावधन येथे घडला. या प्रकरणी सचिन पांडुरंग पिटले (रा. लक्ष्मीनगर, पिंपळे गुरव, मूळ- परभणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार लालमतकुमार भोडेला आदिवासी, संजीवकुमार श्रीरामप्रसाद तिवारी, अनुज पवन मिश्रा व अनिलकुमार रामप्रकाश मिश्रा (सर्व रा. बावधन) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादी हे सामान शिफ्टिंग करीत असताना आरोपींनी त्यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी व बांबूने मारहाण केली. तसेच सिद्धार्थ सोनवणे व अभिषेक फासगे यांच्याही डोक्यात, पाठीत मारहाण करून जखमी केले.
तडीपार गुंडाला कोयत्यासह अटक
पिंपरी : जिल्ह्यातून तडीपार केलेले असताना शहरात आलेल्या एका तडीपार गुंडाला देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून एक कोयता जप्त केला. ही कारवाई देहूरोड येथे करण्यात आली. समीर दीपक डीक्का (रा. पारशी चाळ, देहूरोड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला दोन वर्षांसाठी जिल्ह्यांतून तडीपार केले आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.