

Young Man Shot Dead Over Land Dispute
Sakal
पिंपरी : डोक्यात गोळी झाडून तरुणाचा खून करण्यात आला. ही घटना चऱ्होली-वडमुखवाडीत खडीमशिन रस्ता परिसरात बुधवारी (ता.१२) सायंकाळी घडली होती. यातील आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी तरुणाच्या नातेवाइकांनी दिघी पोलिस ठाण्यात गुरुवारी पहाटेपर्यंत ठिय्या मांडला होता. जमिनीच्या वादातून हा खून झाला असावा, असा अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.