पिंपरी-चिंचवड शहरात पहा कोठे मिळणार शिवभोजन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

येथे मिळेल थाळी
    महापालिका भवनाच्या आवारातील उपाहारगृहात १०० थाळी
    वायसीएम हॉस्पिटल उपाहारगृहात १५० थाळी
    वल्लभनगर एसटी स्टॅंड उपाहारगृहात १५० थाळी
    नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयाच्या आवारातील उपाहारगृहात १०० थाळी

अशी असेल थाळी
    दोन चपात्या (प्रत्येकी ३० ग्रॅम)
    एक वाटी भाजी (१०० ग्रॅम)
    एक मूद (मूठ) भात (१५० ग्रॅम)
    एक वाटी वरण (१०० ग्रॅम)

शिवभोजनाची वेळ : दुपारी बारा ते दोन
भोजनालयासाठी निकष

    एका वेळी किमान २५ लोकांच्या जेवणासाठी पुरेशी जागा उपलब्ध हवी
    शिळे किंवा खराब झालेले अन्न देऊ नये
    स्वतःच्या कर्मचाऱ्यांना सवलतीत जेवण देऊ नये

पिंपरी - गरीब व गरजू व्यक्तींना सवलतीत अर्थात अवघ्या दहा रुपयांत शिवभोजन उपलब्ध करून देण्याची योजना राज्य सरकारने आखली आहे. त्यासाठी शहरातील चार ठिकाणांची निवड केली आहे. २६ जानेवारीपासून योजनेची सुरुवात होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर तीन महिन्यांसाठी ही योजना राबविण्यात येणार असून, दिवसाला पाचशे व्यक्तींना सवलतीत भोजन मिळणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिका स्तरावर शिवभोजन योजनेसाठी भोजनालयाची निवड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्तक्षतेखाली समिती नियुक्त केलेली आहेत. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पाच नद्यांच्या पाण्याने अभिषेक

यात महापालिका आयुक्त सदस्य आणि जिल्हा पुरवठा अधिकारी किंवा अन्नधान्य वितरण अधिकारी सदस्य सचिव आहेत. सक्षम खानावळ, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गट, सुसज्ज भोजनालय, उपहारगृह या बाबींसह नागरिकांच्या वर्दळीच्या ठिकाणांचा विचार करून शहरातील चार संस्थांची निवड समितीने केली आहे. शहरात योजना सुरू करण्याबाबत राज्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी नुकतीच संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन माहिती दिल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. 

सरकारी अनुदान
नागरिकांना दहा रुपयांत भोजन मिळणार असले, तरी ते पुरविणाऱ्या संस्थेला राज्य सरकारकडून अनुदान मिळणार आहे. एका थाळीचा दर पन्नास रुपये ठरविण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित संस्थांना प्रतिथाळी चाळीस रुपये अनुदान दिले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pimpri-Chinchwad city see where to find Shivbhojan