पिंपरी-चिंचवड दर्शन बस प्रतिसादाअभावी बंद

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

देखभाल खर्चच अधिक
पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवेसाठी टाटा मार्कोपोलोच्या वातानुकूलित बस दिल्या होत्या. मात्र, त्याला प्रवासी मिळत नसल्याने व त्या बंद ठेवल्यास खराब होऊ शकतात. त्यामुळे या बसच्या दोन महिन्यांपासून पुणे महापालिका भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन या मार्गावर रोज चार फेऱ्या करत आहेत. ५२ आसनी वातानुकूलित बससाठी रोज सहा हजार रुपयांचे डिझेल खर्च होत आहे. अन्य देखभाल खर्च वेगळा आहे.

पिंपरी - शहरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पीएमपीने सुरू केलेल्या पिंपरी-चिंचवड दर्शन बसला प्रतिसाद मिळत नसल्याने ती बंद आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यासाठी पीएमपीला दिलेल्या दोन वातानुकूलित बस सुरू राहाव्यात यासाठी त्या सध्या पुणे महापालिका भवन ते आकुर्डी रेल्वे स्टेशन मार्गावर धावत आहेत. गेल्यावर्षी १५ ऑगस्टला पिंपरी-चिंचवड दर्शन बस सेवेला प्रारंभ झाला. 

'येवले चहा'मध्ये भेसळ; लाल रंगाचे गुपित उघड

शहरातील चापेकर स्मारक, देहू, आळंदी, दुर्गा टेकडी, सायन्स पार्क, अप्पूघर, सर्पोद्यान या ठिकाणांचा त्यात समावेश होता. त्यासाठी प्रत्येक माणसी ५०० रुपये भाडे होते. 
पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवड शहरात हा प्रयोग राबविण्याचे नियोजन होते. मात्र, गेल्या सहा महिन्यांत या बसला प्रतिसाद मिळाला नसल्याने ती बंद आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा सुरू केल्यानंतर पीएमपी प्रशासनाने त्याचा प्रचार करणे अपेक्षित होते. मात्र, प्रत्यक्षात तसे झाले नाही. तसेच बससाठी निश्‍चित केलेले भाडेही जास्त असल्याने अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad closed due to lack of bus response