पुणे दर्शनच्या धर्तीवर आता पिंपरी चिंचवड दर्शन !

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 25 February 2020

पुणे : पुणे दर्शनच्या धर्तीवर पिंपरी आणि चिंचवड दर्शन बससेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रवाशांना ऑनलाईन बुकींग करता येईल. पिंपरी चिंचवड दर्शनसाठी निगडी आणि भोसरीवरून बस सुटणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे : पुणे दर्शनच्या धर्तीवर पिंपरी आणि चिंचवड दर्शन बससेवा सुरू करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी प्रवाशांना ऑनलाईन बुकींग करता येईल. पिंपरी चिंचवड दर्शनसाठी निगडी आणि भोसरीवरून बस सुटणार आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पुणे परिसरातील प्रेक्षणीय स्थळांसाठी पुणे दर्शन ही बससेवा पीएमपीने सुरू केली आहे. मात्र, पिंपरी चिंचवडमधील दर्शनीय स्थळांसाठी अशी कोणतीही सुविधा नव्हती. पिंपरी चिंचवड दर्शन ही बससेवा सुरू करण्यात यावी, अशी मागणी त्या भागातील प्रवाशांनीही वारंवार केली होती. संचालक मंडळाच्या बैठकीतही या बाबत चर्चा झाली होती. या पार्श्‍वभूमीवर पीएमपी प्रशासनाने पिंपरी चिंचवड दर्शन बससेवा नुकतीच सुरू केली आहे. पिंपरी चिंचवड आणि परिसरातील 20 ठिकाणांची त्यासाठी निवड करण्यात आली आहे. त्यासाठी दोन बस स्वतंत्र मार्ग असतील. त्यामुळे प्रवाशांना कोणत्या स्थळांना भेटी द्यायच्या, या बाबतचा निर्णय घेता येणार आहे. प्रती प्रवासी 500 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. पीएमपीएमएलच्या संकेतस्थळावर (www.pmpml.org) या बससेवेसाठीचे बुकींग प्रवाशांना करता येईल. तसेच बस किती वाजता सुटेल, किती वेळ लागेल, आदींचेही तपशील संकेतस्थळावर आहेत, असे प्रशासनाने कळविले आहे.

डोनाल्ड ट्रम्प ज्या पक्षाचे त्या पक्षाचा 'हा' मराठी माणूस आहे अध्यक्ष

पिंपरी चिंचवड दर्शन
पर्याय 1)
आयकॉन मंदिर, मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चाफेकर वाडा, चाफेकर बंधू स्मारक, विज्ञान पार्क, बर्ड व्हॅली, देहूगाव (मंदिर), देहू गाथा मंदिर, अप्पूघर, दुर्गा टेकडी आदी 10 ठिकाणे - बस निगडीवरून सुटेल.

पर्याय 2) शिवसृष्टी, सायन्स पार्क, चाफेकर बंधू स्मारक, मोरया गोसावी मंदिर, मंगलमूर्ती वाडा, चाफेकर वाडा, इस्कॉन मंदिर, अप्पूघर- दुर्गा टेकडी, बर्ड व्हॅली, आळंदी आदी 10 ठिकाणे - बस भोसरीवरून सुटेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pimpri Chinchwad Darshan started Like Pune Darshan !