
पिंपरी चिंचवडमध्ये वैष्णवी हगवणे हिनं हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून जीवन संपवलं होतं. यानंतर आता आणखी एक अशीच घटना पिंपरी चिंचवडमध्ये घडलीय. विवाहितेनं गळफास घेत आत्महत्या केलीय. बोऱ्हाडेवाडी इथं विवाहितेनं आत्महत्या केली असून पोलिसांनी एकाला अटक केली आहे.