
Pimpri Rain
Sakal
पिंपरी : २४ तासांपेक्षा जास्त वेळ सुरू असलेला पाऊस, धरणांतून सोडलेले पाणी, भुयारी मार्गांना आलेले तलावाचे स्वरूप आणि रस्त्यांवरील खड्डे, यामुळे पिंपरी चिंचवडमधील जनजीवन पुन्हा विस्कळित झाले.
पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी शहरातील बहुतांश भुयारी मार्गांत सक्षम सुविधा नाही. त्यामुळे अल्पशा पावसानेही त्यांत पाणी साचते. पावसाळी वाहिन्यांचे कमकुवत व्यवस्थापन, सदोष बांधकाम, नियोजनचा अभाव अन् त्यात भर म्हणजे प्रशासनाचे दुर्लक्ष. याचा फटका वाहनाचालकांसह पादचाऱ्यांनाही बसत आहे. भुयारी मार्गांमध्ये पाणी साचल्यामुळे वाहतूक कोंडीला वारंवार तोंड द्यावे लागत आहे.