Video:अवैध बांधकामांना कर माफी? पिंपरी महापालिकेत गोंधळ

टीम ई-सकाळ
शुक्रवार, 10 जानेवारी 2020

पिंपरी चिंचवड शहरात विविध सेवा वाहिण्यांसाठी रस्त्यांची खोदाई सुरू आहे. तेथील कर्मचऱ्यांच्या सुरक्षा उपाय योजना केल्या जात नाहीत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील अवैध बांधकामांना सरसकट शास्ती कर माफ करण्याच्या उप सूचनेस राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध काला. हा विरोध डावलून विषय मंजूर करून घेण्यात आल्यानंतर महापालिका सभागृहात गोंधळ सुरू झाला. या गोंधळातच महापौर उषा ढोरे यांनी कामकाज उरकले. महापौर उषा ढोरे सभेच्या अध्यक्षसस्थानी होत्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरात विविध सेवा वाहिण्यांसाठी रस्त्यांची खोदाई सुरू आहे. तेथील कर्मचऱ्यांच्या सुरक्षा उपाय योजना केल्या जात नाहीत. काम पूर्ण झाल्यानंतर राडारोडा उचलला जात नाही. खडी, दगड रस्त्यावर पसरून अपघात होत आहेत. याला जबाबदार कोण? असे म्हणत महापालिका सर्व साधारण सभेत नगरसेवकांकडून प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. फुगेवाडी दुर्घटनेत अग्नशमक दलातील जवान विशाल जाधव व मजूर नागेश जमादार यांच्या मृत्यूप्रकरणी अधिकारी व ठेकेदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी नगरसेवकांनी केली. मयत व्यक्तींच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपये मदत तत्काळ देण्यात यावी तसेच जाधव यांना शहीद दर्जा देण्याची मागणी करण्यात आली. भाऊसाहेब भोईर, मंगला कदम, दत्ता साने, आशा शेंडगे, सीमा सावळे, हर्षल ढोरे, अंबरनाथ कांबळे, तुषार कामठे, राहुल कलाटे, स्वाती काटे, सुजाता पलांडे, राजू बनसोडे, बाबू नायर, तुषार कामठे, नाना काटे, विलास मडी गेरी यांनी चर्चेत सहभाग घेतला.

आणखी वाचा - पुण्याच्या बातम्यांसाठी येथे ► क्लिक करा

शहीद जवान जाधव यांच्या पत्नीस अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यासाठी आठ दिवसांत अर्ज पूर्तता केली जाईल. विम्याच्या माध्यमातून वीस लाखांपर्यंत मदत होईल. मजूर जामदार यांना दोन लाख पर्यंत मदत ठेकेदाराकडून दिली जाईल आणि आणखी मदत दिली जाईल.
-श्रावण हर्डिकर, आयुक्त, पिंपरी-चिंचवड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri chinchwad municipal corporation meeting mess over tax on illegal constructions