
Pimpri Lift Accident
esakal
पिंपरीतील चौवीसवाडी येथे लिफ्टमध्ये अडकून १२ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. सोसायटीच्या लिफ्टचा दरवाजा वेळेत न उघडल्यामुळे हा हृदयद्रावक प्रकार घडला. अग्निशमन दलाच्या मदतीने मुलाला बाहेर काढण्यात आले, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. २ ऑक्टोबर २०२५ रोजी संध्याकाळच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.