Video: IPS कृष्ण प्रकाश यांची 'मन की बात'; मुळशी पॅटर्नचा केला 'अभ्यास'

IPS_Krishna_Prakash
IPS_Krishna_Prakash

आळंदी (पुणे) : पिंपरी महापालिका आयुक्तालयाच्या कारभार हाती आल्यावर लक्षात आले की इथे मुळशी पॅटर्न जोरात चालतो. मग मी तीन वेळा सिनेमा पाहिला. एवढेच काय दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्यासोबतही सिनेमा पाहिला. एक गुंड जेलमधून सुटल्यावर त्याच्या स्वागतासाठी चारचाकी गाड्या आणि तरुणाईची गर्दी मोठी होती. चार वर्षे मोका अंतर्गत शिक्षा भोगलेला आणि जेलमधे राहिलेला गुन्हेगार तरुणांचा आदर्श का असू शकतो? असा सवाल करत इथल्या तरुणाईची अधिक चिंता वाटत असल्याचे काळजीयुक्त विधान मंगळवारी (ता.१६) पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी आळंदी व्यक्त केले.

वाहतूक शाखेच्या ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानच्या निमित्ताने कृष्ण प्रकाश बोलत होते. कृष्ण प्रकाश यांच्या प्रमुख उपस्थितीत वाहतूक नियमांच्या जनजागृतीसाठी आळंदीत वारकरी विद्यार्थी आणि तरुणाईसह रॅली काढण्यात आली. यानंतर कृष्ण प्रकाश संबोधित करत होते.

यावेळी कृष्ण प्रकाश म्हणाले, ''आजच्या तरुणांच्या हातात पैसा आणि वाहन सहज उपलब्ध होत आहे. आपल्या मुलाच्या हातात वाहन देताना पालकांनी अधिक सतर्क राहिले पाहिजे. पालकांना आणि मुलांना तळमळ वाटत नाही की इतरांच्या जिवासाठी वाहतूक नियमाचे पालन करावे. तुमचा जीव गेला आणि दुर्घटना झाली तर परिणाम कुटुंबासह अनेकांना भोगावे लागतात. आजची तरुणाईच्या हातात पैसा आणि इंटरनेट पडल्याने तो वेगळ्याच विचारांकडे आकृष्ट होत आहे. अंगात जोष आहे, तर तुम्ही गुन्हेगारांशी, वाईटाशी मुकाबला करा. जोशात राहून स्वत: चूक करू नका.

पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील परिस्थिती भयानक आहे. तरुणाईला वाचवायचे आव्हान नव्या पिढीसमोर आहे. नुकतेच चार वर्षे मोका चालविलेला गुन्हेगार जेलमधून सुटला, तर त्याच्या समर्थनासाठी तरुणांची गर्दी होते. चार वर्षे जेलमध्ये सडत राहिलेला आणि अनेक गुन्हे केलेला गुन्हेगार तुमचा आदर्श कसा असू शकतो? याच गोष्टीमुळे तरुणांच्या भविष्याची चिंता वाटते. मुळशी पॅटर्न इथे खूप चालतो असे मला कळाले, मग मी त्याचा अभ्यास केला.''

कृष्ण प्रकाश पुढे म्हणाले, 'सिनेमामध्ये गुन्हेगाराचा शेवट काय होतो हे मुळशी पॅटर्नमधे दाखवले. तरीही तरुणाई वाममार्गाला का जात आहे? अहंकार बाजूला ठेवून जीवन जगायला शिका. लोक खराब झाले तर देशही खराब होईल. म्हणून संतांच्या भूमीत जन्मलेल्यांनी नेहमीच दुसऱ्यांचा आदर राखला पाहिजे. गरजेसाठी मोबाईलचा वापर करा. सोशल मीडिया हाताळताना लोकभावना दुखावणार नाही याची काळजी घ्या.'

यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी, वारकरी विद्यार्थी, लेझीम पथक, टाळ-मृदंगाचा गजर करत रस्ता सुरक्षा अभियानची रॅली काढली. बैलगाडी आणि पालखीद्वारे वाहतुकीच्या निमयांबाबत अनोखी जनजागृती शहरात करण्यात आली. सहायक पोलिस आयुक्त श्रीकांत डिसले, रविंद्र चौधर, ज्ञानेश्वर साबळे,  प्रकाश शिंदे, सुरेश वडगावकर, अजित वडगावकर, डी. डी. भोसले, तुषार घुंडरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com