
Women Sanitation Workers
Sakal
पिंपरी : कोणतेही शहर अथवा गावाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी नियमित स्वच्छता महत्त्वाची ठरते. मात्र, कचऱ्याच्या राक्षसामुळे विद्रुपीकरण होते. रोगराई वाढते. त्यातून मुक्तीसाठी, अस्वच्छतेच्या राक्षसाचा वध करण्यासाठी आरोग्य विभागातील सफाई कर्मचारी, अधिकारी सतत लढत असतात. यामध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेवेत कार्यरत सेवकांचाही समावेश आहे. सहा आरोग्य निरीक्षक महिलांसह सुमारे साडेचारशेपेक्षा अधिक महिला दररोज अस्वच्छतेच्या राक्षसाचा वध करत आहेत.