वाहतूक व्यवस्थेचा आणि शिस्तीचा बोजवारा... (व्हिडिओ)

शिवाजी आतकरी
गुरुवार, 12 जुलै 2018

विद्यार्थी- पालकांचा जीव मुठीत

पिंपरी-चिंचवडः शाळा-महाविद्यालय भरताना आणि सुटताना परिसरात होणारी तुडुंब गर्दी, वाहतूक व्यवस्थेचा आणि शिस्तीचा बोजवारा यांमुळे विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीला लागतो. उदासीन पोलिस व शाळा प्रशासन पहाता मोठा अपघात होण्याची हे वाट पहात आहेत का, असे उद्वेगाने म्हणावे लागत आहे.

विद्यार्थी- पालकांचा जीव मुठीत

पिंपरी-चिंचवडः शाळा-महाविद्यालय भरताना आणि सुटताना परिसरात होणारी तुडुंब गर्दी, वाहतूक व्यवस्थेचा आणि शिस्तीचा बोजवारा यांमुळे विद्यार्थी व पालकांचा जीव टांगणीला लागतो. उदासीन पोलिस व शाळा प्रशासन पहाता मोठा अपघात होण्याची हे वाट पहात आहेत का, असे उद्वेगाने म्हणावे लागत आहे.

'कोंडीची शाळा' सुटणार... (फोटो फीचर)
(छायाचित्र व व्हिडिओ- संतोष हांडे)

म्हाळसाकांत विद्यालय परिसरातील चित्र यासाठी पुरेसे बोलके आणि शहरातील शाळा परिसराचे प्रातिनिधिक उदाहरण आहे. कमी अधिक फरकाने सर्वत्र अशीच परिस्थिती आहे. रस्त्याच्या कडेला दुतर्फा होणारे पार्किंग वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. त्यातही भरधाव व कर्णकर्कश आवाज करीत जाणारी वाहने रस्ता ओलांडणाऱ्या विद्यार्थी पालकांच्या मनात भीती निर्माण करतात. तसेच अपघाताला निमंत्रण यातून मिळत आहे. विद्यार्थ्यानी भरगच्च रिक्षा, दुचाकीवर चार-चार विद्यार्थी घेऊन जाणारे पालक, हे धोकादायक असतानाही नेहमी दिसणारे चित्र.

शाळा परिसरात असणारे ही परिस्थिती नियंत्रित करण्यासाठी ना शाळा प्रशासनाचे, ना वाहतूक पोलिसांचे प्रयत्न. आकुर्डीतील म्हाळसाकांत विद्यालय परिसरात पदपथ टपऱ्यानी व्यापले आहेत. तसेच शेजारीच केलेली पार्किंगमुळे पदपथावरून चालताही येत नाही.येथे रस्ता ओलांडून जाणे जिकिरीचे असते. एकूणच शाळा परिसरातील परिस्थिती अपघाताला निमंत्रण देणारी आहे आणि प्रशासन ढिम्म आहे.

पदपथावरून चालणे आणि रस्ता ओलांडणे अवघड होऊन जाते. वाहनचालक आणि टपोरी पोरांची परिस्थिती नेहमी आढळते.
- माधवी शिंदे (पालक)

हॉर्न, गोंधळ, वाहनचालकांची बेशिस्ती त्यामुळे पाल्यास सोडायला येणे भाग पडते. एकूणच असुरक्षित परिस्थिती विद्यालयाच्या बाहेर असते.
- रविकिरण राठोड (पालक)

इतर शाळांचीही गर्दी, पार्किंग यांमुळे या परिसरात गोंधळाची गर्दीची परिस्थिती निर्माण होते. काही स्वयंसेवी संस्थाची मदत घेऊन वाहतूक आणि इतर परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. पोलिसांचेही सहकार्य मिळत आहे.
- ए एम शेख (प्राचार्य, म्हाळसाकांत विद्यालय)

Web Title: pimpri chinchwad traffic issue