Pimpri Chinchwad Case
esakal
पुणे
Pune Crime : चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची गळा आवळून हत्या; महापालिका निवडणूक लढवण्याची सुरू होती तयारी
Pimpri Chinchwad Case : चिंचवड येथे पत्नीकडून पतीचा खून झाला. चारित्र्यावर सतत संशय घेतल्याने वाद वाढले आणि अखेर पत्नीकडून कापडाने गळा आवळून खून करण्यात आला.
पिंपरी : पुरोगामी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या पतीचा पत्नीने कापडाने गळा आवळून खून केला. चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याच्या कारणावरून पत्नीने खून (Pimpri Chinchwad Case) केल्याचे उघड झाले. चिंचवडमधील लिंक रोड येथील माणिक कॉलनीतील महापालिकेच्या आरोग्य केंद्राच्या इमारतीत गुरुवारी रात्री हा प्रकार घडला.
