

पिंपरी : बेकायदारित्या पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. ही कारवाई निघोजे येथे करण्यात आली. प्रतीक उमेश बोचरे (रा. मेदनकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली आहेत.
मारहाणप्रकरणी पिता-पुत्रावर गुन्हा
पिंपरी : सार्वजनिक रस्त्यात मोटार लावल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने मोटार बाजूला घेण्यास सांगितल्याच्या कारणावरून पिता-पुत्राने मिळून दोघांना मारहाण केली. ही घटना सुसगाव येथे घडली. या प्रकरणी अमोल संपत चांदेरे (रा. सुसगाव) यांनी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित गुलाब चांदेरे आणि गुलाब चांदेरे (दोघेही रा. सुसगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने त्यांची मोटार सार्वजनिक रस्त्यावर लावून वाहतुकीस अडथळा निर्माण केला. फिर्यादीचा मार्ग अडवला होता. दरम्यान, मोटार काढण्यास सांगितली असता आरोपींनी फिर्यादीच्या अंगावर धावून जात त्यांना शिवीगाळ, दमदाटी करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या डोक्यात दगड मारण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, गुलाब चांदेरे यानी फिर्यादीच्या पुतण्यालाही शिवीगाळ व मारहाण केली.
गांजा बाळगणारा एकजण अटकेत
पिंपरी : दापोडीतील जुनी सांगवीकडे जाणाऱ्या रस्त्यावर दापोडी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणाकडून १५ हजार ४५० रुपयांचा गांजा जप्त केला. उमेश अशोक राजपूत (रा. दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
चिंचवडमध्ये पिस्तूल जप्त; एकाला अटक
पिंपरी : चिंचवडमधील दत्तनगर येथे पिंपरी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका तरुणाकडून ५१ हजार रुपये किमतीचे एक पिस्तूल आणि दोन काडतूस जप्त केली. वैभव सुरेश माने (रा. पत्राशेड, दत्तनगर, चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.