पिंपरी : लसीकरण केंद्रावर डोस जातोय वाया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Covid Vaccine

पिंपरी : लसीकरण केंद्रावर डोस जातोय वाया

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : मंगळवार, दुपारी ११.३० ची वेळ. महापालिकेचे काळेवाडीतील पवनानगर कोविड लसीकरण केंद्र. दूसरा डोस घेणारे अवघे एक ते दोघेच जण केंद्रावर. सहाशे डोस दैनंदिन होणाऱ्या केंद्रावर आता ५० ते ६० जणांचे लसीकरण होत असल्याचे चित्र दिसले.

एका बाटलीतून दहा जणांना डोस दिला जात होता. परंतु, सायंकाळी एका डोसचे सील फोडल्यानंतर लसीकरणासाठी नागरिकच नसल्याने डोस वाया जात आहेत. अशावेळी एका केंद्रावर एक डोस वाया जात असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. सध्या हे प्रमाण दैनंदिन दोन टक्के असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांचे पगार थकल्याची चर्चा सुरू होती.

ता.२३, वेळ : ११.३७ काळेवाडी गावठाणातील कै. बंडू नामदेव नढे प्राथमिक शाळा, काळेवाडी गावठाण येथील लसीकरण केंद्रावर वय वर्ष १८ पुढील पहिला व दूसरा डोस सुरु असल्याचे नामफलक होते. परंतु, प्रत्यक्षात केंद्र बंद होते. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील केंद्रावर पिंपरी वाघेरे, मुले क्र. ३१/१ व कन्या क्र. ३२/१ या लसीकरण केंद्रावर देखील हीच परिस्थिती होती. सर्व केंद्रावर शुकशुकाट असल्याचे पहावयास मिळाले.

काय गरजेचे

  • केंद्रावर एक वैद्यकीय अधिकारी हवा

  • ॲंटीजेन तपासणीची सोय

  • लसीचे तापमान मेंटेन ठेवणे आवश्यक

  • सर्व केंद्रावर पोलिस यंत्रणा

हेही वाचा: आझाद मैदानात आंदोलक संतप्त; पोलिसांचा मोठा बंदोबस्त

"लस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प काही पॉइंट मध्ये आहे. दैनंदिन शासनाला लस वाया जाण्याचा अहवाल पाठविला जात आहे. लस वाया जात असल्यास त्वरित कारवाई होइल. यासाठी चोखपणे यंत्रणा कार्यरत आहे. काही प्रमाणात डोस वाया जात असतील ते नाइलाजास्तव जात आहेत. त्याला काही पर्याय नाही."

- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी

"दहा नागरिक लसीकरणासाठी आल्याशिवाय एक बाटली खुली केली जात नाही. सील बाटली फोडता येत नसल्याने केंद्रावर दहा नागरिक जमल्यानंतरच ती फोडली जाते. त्यासाठी नागरीकांना प्रतिक्षा करावी लागते. सध्या शासनाकडून दहा टक्क्यांपर्यंत लशी वाया जाण्याच्या प्रमाणाला परवानगी आहे. काटेकोरपणे लशींचे मूल्यांकन सुरु आहे. रेफ्रिजरेटर योग्य पद्धतीने केल्या जात आहेत. सध्या लस वाया जाण्याचे प्रमाण अत्यल्प आहे."

- शिरीष पोरेड्डी, प्रवक्ता

loading image
go to top