

पिंपरी, ता. २२ ः नाल्यांचा नैसर्गिक प्रवाह अबाधित ठेवणे, पावसाळ्यात पूरस्थिती टाळणे, सार्वजनिक रस्ते आणि पदपथ नागरिकांसाठी सुरक्षित व मोकळे ठेवणे, अनधिकृत बांधकामांना आळा घालणे या उद्देशाने महापालिकेचा अतिक्रमण निर्मूलन विभाग कारवाई करत आहे. एक एप्रिल ते २२ जूनपर्यंत विभागाने ८२० ठिकाणी कारवाई केली. एक लाख चार हजार २७१ चौरस मीटर क्षेत्रावरील ४५१ अनधिकृत बांधकामे हटवली. नाल्यांवरील २३ अतिक्रमणे हटवून ८३९ चौरस मीटर क्षेत्र मोकळे केले. ३४६ पथारीवाले, फेरीवाल्यांवर कारवाई केली, अशी माहिती आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.