पर्यावरण जनजागृतीचे ‘क्षितिज’ विस्तारणार 

पर्यावरण जनजागृतीचे ‘क्षितिज’ विस्तारणार 

पिंपरी - आज देशभरात ‘युवा दिन’ साजरा होत असताना, निगडी-यमुनानगरमधील क्षितिज विचारे या युवकाने नेपाळपर्यंत सायकल सफर करून युवा वर्गाला शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या २६ जानेवारीला मुंबई (गेट वे ऑफ इंडिया) येथून त्याच्या या मोहिमेचा प्रारंभ होणार असून सागरी कनारपट्टी मार्गे नेपाळचा दौरा करणारा तो देशातील पहिला सायकलपटू ठरेल.

६४ दिवसांच्या या मोहिमेमध्ये क्षितिज एकूण साडेसात हजार किलोमीटरची सायकल सफर करणार आहे. गेट वे ऑफ इंडियाजवळून मोहिमेस प्रारंभ होईल. त्यानंतर अलिबाग, गोवा, कन्याकुमारी, चेन्नई, कोलकता, सिक्कीम, भूतान मार्गे प्रवास करून नेपाळमधील स्वयंभू स्तुपा येथे मोहिमेचा समारोप होईल. या एकूण सायकल सफरीमध्ये तीन देश, बारा राज्ये आणि तब्बल नऊ पर्वत रांगा सर करण्याचा पराक्रमही क्षितिज करणार आहे. जवळपास तीन हजार किलोमीटर अंतराच्या पर्वतरांगा सर करणे म्हणजेच उत्तरेकडील प्रवास तसा खडतर व जिकिरीचा मानला जातो. त्यामुळे सायकलवरून हा प्रवास करण्याचा प्रयत्न खचितच झाला आहे. त्या पार्श्‍वभूमीवरच ही मोहीम नवा विक्रम प्रस्थापित करेल, असा विश्‍वास क्षितिजला वाटतो. 

जनजागृतीचा उद्देश
विक्रमासाठी नाही, तर सायकलसफरीचा वेगळा आनंद लुटण्यासाठी विशेषत: समाजाला शारीरिक तंदुरुस्ती, पर्यावरण रक्षणाचे महत्त्व पटवून देण्यासाठीच आपण ही मोहीम हाती घेतल्याचे क्षितिजने सांगितले. सायकल वापराबाबत जागृती निर्माण करणे, हा यामागील उद्देश असल्याचे त्याने सांगितले. 

कृतीतून संदेश
पर्यावरण संरक्षणासाठी तसेच युवकांना निरोगी आरोग्याचा संदेश देण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलतो. पर्यावरण रक्षणाच्या केवळ गप्पा मारणारे पुष्कळ भेटतात. शारीरिक आरोग्यासाठीदेखील व्याख्याने आयोजित केली जातात. मात्र, हजारो किलोमीटरचा प्रवास करून आपल्या कृतीपूर्ण संदेश देणारा क्षितिज निराळाच.

आजवरचा प्रवास
 पुणे ते कन्याकुमारी तीन हजार दोनशे कि.मी.चा प्रवास तीन वेळा
 आठ वेळा गोव्याची सायकल सफर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com