जगताप डेअरी-वाकड परिसर फर्निचर हब

Furniture-Hub
Furniture-Hub

पिंपरी - घर सजविण्याचा मोह प्रत्येकालाच होतो. ग्राहकांची हीच बाजू ओळखून जगताप डेअरी-वाकडमधील हिंजवडी रस्त्यालगत फर्निचरची दुकाने थाटली गेली. छोट्या दुकानांची जागा आता मोठ्या शोरूम्सनी घेतली आहे. त्यामुळे आयटी हबपाठोपाठ शहरात फर्निचर हबही विकसित झाले आहे. मुंबई व खराडीनंतर (पुणे) फर्निचर विश्‍वात शहराची वेगळी ओळख निर्माण होत आहे. 

इम्पोर्टेड फर्निचरही
भारतीय फर्निचरबरोबरच अत्यंत आकर्षक आणि उत्कृष्ट बनावटीच्या (फिनिशिंग) मलेशियन फर्निचरला विशेष मागणी आहे. त्याचे दरही भारतीय फर्निचरच्या तुलनेत ३० टक्‍क्‍यांनी कमी आहेत. ते मशिन प्रेसच्या साह्याने बनविले जाते.

फर्निचरची थीम
पारंपरिक (ट्रॅडिशनल), भारतीय आणि मॉडर्न या तीन थिममध्ये फर्निचर मिळते. ट्रॅडिशनल फर्निचरसाठी सागवान लाकडाचा वापर केला जातो. ‘मॉडर्न’मध्ये आजच्या काळाशी सुसंगत व आकर्षकतेवर भर दिला जात आहे. 

भुसा प्लाय व पार्टिकल बोर्ड
बॅचलर वा सतत बदली होणाऱ्या ग्राहकांनी ‘भुसा प्लाय’ व ‘पार्टिकल बोर्ड’पासून (ऊस व लाकडाच्या भुशावर रासायनिक प्रक्रिया करून केलेला प्लाय) बनविलेल्या वस्तूंची विशेष चलती आहे. स्वस्त आणि मस्त अशा प्रकारातील हे फर्निचर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनाही आकर्षित करीत आहे. 

हजारो तरुणांना रोजगार
शोरूम मालकांचे स्वत:चे फर्निचर कारखाने आहेत. त्यांच्याकडे पाच ते ५० कारागीर, मजूर, कर्मचारी, वाहनचालक काम करतात. बहुतांश कारागीर आणि मजूर राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार येथून आले आहेत. केवळ फर्निचर हबमुळे हजारो तरुणांना रोजगार मिळाला आहे.

फर्निचरचे प्रकार
 बेडरूम सेट : साइड टेबल, ड्रेसिंग टेबल, वॉर्डरोब, बेड
 लिव्हिंग रूम : सोपा सेट, एलसीडी युनिट, टीव्ही बेस, हॅंगवॉल, टीपॉय, डायनिंग टेबल सेट
 किचन : मॉड्यूलर किचन ट्रॉली, क्रोकरी सेक्‍शन, लॉप्ट
 आउट डोअर फर्निचर : खुर्च्या, कॉपी टेबल, झोपाळे, आराम खुर्च्या
 ऑफिस फर्निचर : खुर्च्या, टेबल, कपाटे
 स्टडी : ऑफिस टेबल, कॉम्प्युटर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, बंगोई, कॉर्नर टेबल, टी-टेबल, स्टूल
 आकर्षकतेचे कारण : आर्टिफिशियल लेदर, ग्लास, मिरर, फॅब्रिक

प्लायवूडच्या ठळक बाबी
 प्लायवूडमध्ये १८ प्रकार
 टिकवूड, सालवूड, पाइनवूडला विशेष मागणी
 भारतीय फर्निचर हॅंडमेड असल्याने अधिक टिकावू
 सोफा व कबर्डचे प्रत्येक आठवड्याला पाच नवीन डिझाइन लाँच
 रेडिमेड फर्निचरला प्राधान्य
 ५० टक्के ग्राहकांचा कस्टमाइज फर्निचरवर भर
 अनेक मोठ्या शोरूम्स चालकांचा इंटिरियर डिझायनर्सद्वारे फर्निचरचे डिझाइन तयार करून घेण्यावर भर
 शनिवार, रविवार शोरूम्स तुडुंब
 नोव्हेंबर (दिवाळी) ते फेब्रुवारी या काळात व्यवसायाला तेजी
 एप्रिल व मेमध्येही खरेदीत वाढ
 नवनवीन संकल्पना, डिझाइन आणि वापरण्यास सोयीचे फर्निचर
 एक हजार रुपयांपासून दीड ते दोन लाख रुपयांपर्यंत उपलब्ध

फर्निचर हबची वैशिष्ट्ये
 मुंबईतील बांगूनगर फर्निचर बाजारातील ५० टक्‍क्‍यांहून अधिक व्यापाऱ्यांकडून गुंतवणूक
 क्‍लासिक शोरूम उभारण्यावर भर
 एकाच ठिकाणी फर्निचरचे हजारो पर्याय
 ७५ टक्के आयटी कर्मचारी ग्राहक
 मानकर चौक ते वाकड चौक या पाऊण किलोमीटर पट्ट्यात ६० ते ८० दुकाने
 एक हजारपासून पंचवीस हजार स्क्वेअर फूट क्षेत्राचे शोरूम्स

पुण्यातील खराडीनंतर वाकड ‘फर्निचर हब’चा क्रमांक लागतो. वैशिष्ट्यपूर्ण फर्निचरमुळे मुंढवा, कोंढवा, कात्रज, चाकण असे दूरचे ग्राहक आवर्जून खरेदीसाठी येतात. त्यामुळे गेल्या पाच वर्षांत ग्राहक संख्येत ३० टक्‍क्‍यांची भर पडली आहे. इंटेरियर व वातानुकूलित शोरूम विकसित करण्याकडे व्यावसायिकांचा कल आहे.
- झिशान हाशमी, शोरूम मालक

लाकूड आणि प्लायला पर्याय म्हणून आता एमडीएफ (मीडियम डेन्सिटी फायबर बोर्ड), प्री लॅमिनेटेड बोर्डचा वापर केला जात आहे. त्याला कार्यालय स्तरावर विशेषत: माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्यांकडून विशेष मागणी आहे.
- जावेद सैफी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com