esakal | अंगावरून मोटारीचे चाक गेल्याने नऊ वर्षीय मुलगा गंभीर जखमी | Pimpri
sakal

बोलून बातमी शोधा

अंगावरून मोटारीचे चाक

Pimpri : अंगावरून मोटारीचे चाक गेल्याने नऊ वर्षीय मुलगा गंभीर जखमी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पिंपरी : अंगावरून मोटारीचे चाक गेल्याने नऊ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी मोटारचालक महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे.

ईशान प्रदीप कसब (वय ९, रा. साई वास्तू को ओपरेटिव्ह सोसायटी, पिंपळे सौदागर ) असे या घटनेत जखमी झालेल्या मुलाचे नाव आहे. या प्रकरणी सोनल देशपांडे (वय ४०, रा. साई वास्तू को ओपरेटिव्ह सोसायटी, पिंपळे सौदागर ) या महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. ईशान हा त्यांच्या सोसायटीच्या प्ले एरियामध्ये खेळत होता.

हेही वाचा: 'नारायण राणेंनी हफ्तेखोरांची नावे जाहीर करावीत', वैभव नाईकांचं आव्हान

त्यावेळी वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव आलेल्या सोनलच्या मोटारीने इशानला जोरात धडक दिली. त्याच्या अंगावरून मोटारीचे चाक गेल्याने त्याच्या छातीला, तोंडाला, पोटाला गंभीर जखम झाली. उपचारासाठी त्याला तातडीने थेरगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती गंभीर असून उपचार सुरू आहेत.

याप्रकरणी सांगवी पोलिसांनी मोटारचालक महिलेवर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

loading image
go to top