esakal | 'नारायण राणेंनी हफ्तेखोरांची नावे जाहीर करावीत', वैभव नाईकांचं आव्हान
sakal

बोलून बातमी शोधा

vaibhav naik challenge to narayan rane

'नारायण राणेंनी हफ्तेखोरांची नावे जाहीर करावीत', वैभव नाईकांचं आव्हान

sakal_logo
By
दीनानाथ परब

मालवण: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळाचं (Chipi Airport) आज उद्घाटन होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र एकाच मंचावर दिसणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाआधीच श्रेयवादाची जोरदार लढाई रंगली आहे. नारायण राणे यांनी काल माध्यमांशी बोलताना आजच्या सभेत कोकणाच्या (kokan) विकासात कसे अडथळे आणले गेले, हफ्तेखोरी चालते या विषयी गौप्यस्फोट करण्याचा इशारा दिला आहे.

त्या पार्श्वभूमीवर कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी राणेंनी नावे जाहीर करावीतच असे सांगितले. "आज चिपी विमानतळाचं उद्घाटन हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सोन्याचा क्षण आहे. सिंधुदुर्गाचा विकास झाला पाहिजे, ही मुख्यमंत्र्यांची भूमिका असल्याचे" वैभव नाईक यांनी सांगितले.

हेही वाचा: 'भारत जवळचा सहकारी!' डेन्मार्कच्या PM भारत दौऱ्यावर

"चिपी विमानतळाचं काम १५-२० वर्षापूर्वी सुरु झालं. शिवसेना-भाजपा सरकार सत्तेवर आलं, त्यावेळी राणे काँग्रेसमध्ये होते. तेव्हा विमानतळाचं फक्त १२ टक्के काम झालं होतं. खासदार विनायक राऊत आणि सुरेश प्रभू यांनी सातत्याने प्रयत्न केल्यामुळे आज हा विमानतळ होतोय" असे नाईक म्हणाले.

हेही वाचा: पुष्पक एक्सप्रेसमध्ये इगतपुरीजवळ महिलेवर सामूहिक बलात्कार

नारायण राणेंनी हफ्तेखोरांची नावे जाहीर करण्याच इशारा दिलाय. त्यावर वैभव नाईक म्हणाले की, "नारायण राणेंनी हफ्तेखोरांची नावे जाहीर करावीतच. आम्ही सुद्धा आमच्याकडची माहिती जाहीर करु. पण मला खात्री आहे, राणे ही नावे जाहीर करणार नाहीत"

loading image
go to top