सात वर्षांत 400 वेळा सिंहगड केला सर 

सात वर्षांत 400 वेळा सिंहगड केला सर 

पिंपरी - वाकड येथील प्रशांत विनोदे यांनी महाराष्ट्र देशा फाउंडेशनतर्फे गेल्या सात वर्षांत सिंहगडाचा 400 वे ट्रेकिंग पूर्ण केल्याबद्दल सन्मान फाउंडेशनतर्फे सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी रामदास काटे, गणेश भुजबळ, संतोष चिंचवडे, वैभव माळी, उत्तम ढेरे, सुनील साठे, ज्ञानदेव हांडे, हेमंत पाडुळे, अरुण बोरकर आदी उपस्थित होते. 

विनोदे यांना मित्रांमुळे 2010 मध्ये ट्रेकिंगची आवड निर्माण झाली. सात वर्षांत 400 वेळा सिंहगड ते चढले. मित्र महेश यादव यांच्या समवेत सुरू केलेला ट्रेकिंगचा प्रवास आता जीवनाचा एक अविभाज्य छंद बनला आहे. आतापर्यंत रायगड, तोरणा, हरिश्‍चंद्रगड, रोहिडा, रायरेश्वर, केंजळगड, रांगणा, तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर, राजगड, कोराईगड, रतनगड, वासोटा, हरिहर, पुरंदर, शिवनेरी, चावंड, किल्ले जिंजी, राजगिरी, कृष्णगिरी (तमिळनाडू), वेल्लोरचा किल्ला, प्रतापगड, किल्ले राजमाची-श्रीवर्धन व मनरंजन, प्रतापगड, कोकणातील किल्ला जंजिरा, पद्मदुर्ग, कोलाईचा किल्ला, घनगड, रेवंडचा किल्ला, सिंधुदुर्ग, मल्हारगड आदी किल्ल्यांच्या ट्रेक त्यांनी केल्या. तसेच कळसूबाई, पन्हाळा-पावनखिंड-विशाळगड, आनंदबन जंगल ट्रेक, राजगड ते तोरणा यासह मध्य प्रदेश, गुजरात, हिमाचल, कर्नाटक, आंध्र, तमिळनाडू, उत्तरांचल, केरळ, जम्मू-काश्‍मीर या राज्यातही भटकंती झाल्याचे विनोदे यांनी सांगितले. 

विक्रीकर उपायुक्त असणारे मावस भाऊ सुनील काशीद यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील बहुतांश गड किल्ले आणि इतर राज्यातील गड किल्ल्यांचे ट्रेकिंग त्यांनी पूर्ण केले. या छंदामुळे दोन वेळेला अमरनाथ यात्रा पूर्ण केली. प्रत्येक ट्रेकिंगनंतर वडिलांची कौतुकाची थाप मिळत होती. आज ते हयात नाहीत. तरी सुद्धा मला हा छंद जोपासण्यासाठी त्यांचे पाठबळ मिळत असते, असे मत विनोदे यांनी सांगितले. 

ट्रेक वडिलांना अर्पण 
सिंहगडचा 400 वा ट्रेक पूर्ण करत त्यांचे दिवंगत वडील दत्तात्रेय महाराज विनोदे यांना अर्पण केल्याची भावना प्रशांत विनोदे यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com