विदेशी नागरिकावर रेल्वे पोलिसांकडून अंत्यसंस्कार

रविंद्र जगधने
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पिंपरी - कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ 23 ऑक्‍टोबर रोजी आढळलेल्या एका कृष्णवर्णीय विदेशी नागरिकांची ओळख न पटल्याने सोमवारी (ता. 30) रेल्वे पोलिसांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले. मात्र, त्याची ओळख पटण्यासाठी पोलिसांनी प्रयत्नच केले नसल्याची माहिती समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, कासारवाडी रेल्वे स्थानकाजवळ एका विदेशी कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृतदेह पडला असल्याची माहिती पिंपरी रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मृतदेह ताब्यात घेऊन वायसीएम रुग्णालयात त्याचे शवविच्छेदनही केले. मृत व्यक्ती विदेशी नागरिक असल्याचे पोलिसांना माहीत असतानाही पोलिसांनी याबाबत पारपत्र (पासपोर्ट) विभाग व पुणे पोलिस आयुक्तालयाला कळवले नाही. पाच दिवस त्याचा मृतदेह शवागृहात ठेवल्यानंतर सोमवारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत पुणे रेल्वे पोलिस अधीक्षक डॉ. प्रभाकर बुधवंत यांना विचारले असता, त्यांनीही या प्रकाराला दुजोरा दिला. 

मृत व्यक्तीजवळ कोणतेही कागदपत्रे मिळाले नाहीत. त्यामुळे तो परदेशी असल्याचे पोलिसांना माहीत नव्हते. पाच दिवस त्याचा मृतदेह ओळखीसाठी ठेवला होता. मात्र, ओळख न पटल्याने त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ओळख पटली असती, तर पासपोर्ट विभागाला कळवले असते. त्याचे छायाचित्र काढून ठेवले आहेत. 
- डॉ. प्रभाकर बुधवंत, पोलिस अधीक्षक, पुणे रेल्वे.

Web Title: pimpri pune news The funeral from the Railway Police on a foreigner