सॉफ्टवेअर कंपनीतील गोपनीय माहितीची चोरी 

रविंद्र जगधने
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

पिंपरी - सॉफ्टवेअर कंपनीत काम करणाऱ्या तिघांनी सर्व्हरमधून गोपनीय माहिती चोरली, तर काही गोपनीय माहिती नष्ट केल्यामुळे कंपनीचे 17 कोटींचे नुकसान झाले. ही घटना जानेवारी 2016 ते जुलै 2017 या कालावधीत हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्कच्या फेज एकमधील टेक्‍नो सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत घडली. 

याप्रकरणी कंपनीचे मालक उज्ज्वल रैदाणी (वय 39, रा. कोथरूड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कंपनीत काम करणाऱ्या तिघांनी सर्व्हरमधून गोपनीय माहिती चोरली, तर काही नष्ट केली; तसेच या तिघांनी कंपनीची ग्राहक असलेल्या कंपनीशी संपर्क साधून वेगळी कंपनी स्थापन केली. त्यामुळे फिर्यादी यांची कंपनी बंद पडून 17 कोटींचे नुकसान झाले. ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.

Web Title: pimpri pune news Theft of Confidential Information of the Software Company