पाणी शुद्ध करण्यासाठी दोन कोटी

पाणी शुद्ध करण्यासाठी दोन कोटी
Published on

पिंपरी, ता. १९ ः पिंपरी चिंचवड शहराला शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ब्लिचिंग पावडरची खरेदी करण्यात येते. त्यासाठी दोन कोटी रुपये खर्च होणार आहे. त्याला स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी (ता.१९) मान्यता देण्यात आली. स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.
शहरातील नागरिकांना शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने निगडी सेक्टर २३ आणि चिखली टप्पा क्रमांक एक येथील जलशुद्धीकरण केंद्रांसाठी आवश्यक पावडर पॉली इलेक्ट्रोलाईट रसायन खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच याच जलशुद्धीकरण केंद्रांतील निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी स्टेबल ब्लिचिंग पावडर उपलब्ध करून घेण्यासही मंजुरी देण्यात आली, ज्यामुळे जलशुद्धीकरणाची प्रक्रिया तांत्रिक निकषांनुसार सुरळीत पार पडण्यास मदत होईल. याशिवाय पाणीपुरवठा वितरण व्यवस्था अधिक सक्षम ठेवण्यासाठी अजमेरा, मोरवाडी व मासुळकर कॉलनी परिसरातील पाणी वितरण व्यवस्थेचे परिचालन करण्याच्या कामास मंजुरी देण्यात आली. दापोडी, जुनी सांगवी आणि नवी सांगवी भागातील पाण्याच्या टाक्यांची शास्त्रीय पद्धतीने साफसफाई करणे तसेच कृष्णानगर येथील एम-१ आणि एस-२ पंप हाऊस व पाण्याच्या टाक्यांच्या परिसरातील देखभाल, दुरुस्ती आणि परिचालनाची कामे हाती घेण्यासही मान्यता देण्यात आली.
यशिवाय शहरातील उद्यानांची नियमित देखभाल अखंडित राहावी यासाठी सध्या सुरू असलेल्या उद्यान देखभाल कामांना नवीन निविदा प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कार्यालयातील सुविधा अधिक कार्यक्षम व सुस्थितीत ठेवण्यासाठी आवश्यकतेनुसार नूतनीकरण, देखभाल-दुरुस्ती आणि फर्निचरविषयक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. सार्वजनिक वाहतूक आणि दळणवळण अधिक सुरळीत करण्यासाठी रस्ते व बीआरटीएस मार्गांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले. नाशिक फाटा ते वाकड बीआरटीएस रस्त्यावरील आवश्यक दुरुस्ती, पुणे-आळंदी बीआरटीएस कॉरिडॉरवरील डेडिकेटेड लेन व बसथांब्यांची दुरुस्ती, भक्ती-शक्ती चौक ते गोडाऊन चौक या रस्त्याचे पॅचवर्क पद्धतीने डांबरीकरण आणि पुणे-आळंदी रस्त्यावरील पॅचवर्क डांबरीकरण करण्यास मंजुरी देण्यात आली.

शुद्ध पाणीपुरवठा, सक्षम रस्ते, सार्वजनिक वाहतूक, दर्जेदार आरोग्य सेवा आणि स्वच्छता यांना प्राधान्य देतानाच आपल्या युवकांना जागतिक रोजगाराच्या संधींसाठी तयार करणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ‘हर घर तिरंगा’सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक सहभागाला चालना देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- अभिषेक बारणे, सभापती, स्थायी समिती, महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com